सध्या मोठ्या प्रमाणावर यूपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार केले जातात. या माध्यमातून तुम्ही एखाद्याला पैसे पाठवण्यापासून तर तुमच्या घरातील इलेक्ट्रिसिटी बिल ते मोबाईलचे रिचार्ज करण्यापासून अनेक प्रकारचे व्यवहार तुम्ही आता यूपीआयच्या माध्यमातून करू शकतात हे आपल्याला माहिती आहे.
परंतु तरीदेखील बऱ्याच वेळा आपल्याला कॅशची आवश्यकता भासते. अशावेळी रोख रक्कम मिळावी याकरिता बँका किंवा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जावे लागते. परंतु बऱ्याचदा काही कारणामुळे आपल्याला बँक किंवा एटीएममध्ये पैसे काढायला जाणे शक्य होत नाही.
अशावेळी तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँक मदत करू शकते. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ऑनलाईन आधार एटीएम(AePS) सेवेचा फायदा घेऊन तुम्ही घरबसल्या सहजपणे पैसे काढू शकतात. याबद्दलची माहिती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने सोशल मीडियावर एक पोस्ट करून दिली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ऑनलाईन आधार एटीएम सेवेचा लाभ घ्या व घरबसल्या पैसे काढा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून आता ऑनलाईन आधार एटीएम(AePS) सेवेचा लाभ घेऊन तुम्हाला सहजपणे घरी बसून पैसे काढता येणार आहे. यामध्ये तुम्हाला आता पोस्टमन तुमच्या घरी येऊन तुम्हाला रोख रक्कम काढण्यामध्ये मदत करणार आहे.
समजा तुम्हाला अचानकपणे पैसे काढण्याची गरज भासली आहे व तुमच्याकडे बँक किंवा एटीएममध्ये जाण्यासाठी वेळच नाही तर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकतात. या सेवेचे नाव आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम अर्थात AePS असून या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला बायोमेट्रिकचा वापर करून आधार लिंक असलेल्या बँक किंवा पोस्ट खात्यातून पैसे काढता येणे शक्य आहे.
याकरिता तुम्हाला एटीएम किंवा बँकेत पैसे काढायला जायची गरज नाही. बऱ्याच व्यक्तींना काही कारणास्तव बँकेत जाता येत नाही अशा व्यक्तींकरिता ही सुविधा खूप खास ठरणार आहे. आता यामध्ये संबंधित ग्राहकाचे बँक खाते हे त्याच्या आधार नंबरशी लिंक असणे गरजेचे आहे.
एवढेच नाही तर या सेवेचा वापर करून तुम्हाला पैसे देखील पाठवता येतील किंवा तुम्ही या माध्यमातून आधार ते आधार फंड ट्रान्सफर देखील करू शकतात. तसेच तुमच्या बँक खात्याचे मिनी स्टेटमेंट देखील तुम्हाला या सुविधेच्या अंतर्गत उपलब्ध होऊ शकणार आहे.
कसा कराल आधार एटीएमचा वापर?
1- याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी डोअर स्टेप बँकिंगचा पर्याय निवडावा लागेल.
2- त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी तसेच तुमचा पत्ता, पिनकोड, तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस आणि तुमचे खाते असलेले बँकेचे नाव नमूद करावे लागेल.
3- त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी असलेल्या आय ॲग्री(l agree) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4- एवढं केल्यानंतर काही वेळा मध्ये पोस्टमन तुमच्या घरी येऊन तुम्हाला रोख कॅश देऊन जाईल.
5- इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या या AePS सेवेच्या माध्यमातून दहा हजार रुपयांपर्यंतची कॅश व्यवहाराची मर्यादा सेट करण्यात आलेली आहे.