E-Vima Account: उघडा ई-विमा खात आणि तेही मोफत! नाही राहणार विमा पॉलिसीची कागदपत्रे सांभाळण्याची कटकट, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E-Vima Account:- विमा ही भविष्यकालीन आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब असून अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या विमा योजनांमध्ये गुंतवणूक करतात व वेगवेगळ्या विमा पॉलिसीस घेतात. जेव्हा आपण एखादी विमा पॉलिसी खरेदी करतो तेव्हा त्यासंबंधीचे अनेक प्रकारचे कागदपत्रे असतात.

त्यामुळे ही कागदपत्रे आपल्याला सांभाळून ठेवणे खूप गरजेचे असते. परंतु आता भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने यामध्ये एक महत्त्वाचा बदल एक एप्रिल पासून केला असून त्यामुळे आता विमा पॉलिसीचे कागदपत्र सांभाळण्याच्या कटकटी पासून मुक्तता मिळणार आहे. कारण आता एक एप्रिल पासून विमा पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ठेवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.

 मोफत उघडा विमा खाते

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात इर्डाने एक एप्रिल पासून विमा पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ठेवणे अनिवार्य केले असून त्यामुळे आता कागदपत्रांच्या स्वरूपामध्ये विमा पॉलिसी बाळगण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे आता विमाधारकांना ई विमा खाते काढणे बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नसून एखादे अवघ्या सात दिवसांमध्ये तुम्हाला काढता येणार आहे.

 कुणाला देण्यात आला आहे विमा खाते उघडण्याचा अधिकार?

या प्रकारचे खाते काढण्यासाठी विमा नियामक प्राधिकरणाने देशातील चार प्रमुख विमा रिपॉझिटरी ना अधिकार दिलेले आहेत व याच संस्था ग्राहकांचे विमा खाते काढू शकणार आहेत. त्यामुळे आता विमाधारक जी काही विमा पॉलिसी काढतील त्या आता या ई विमा खात्यामध्ये ठेवल्या जाणार आहेत.

विमा नियम प्राधिकरणाने ज्या चार संस्थांना हे खाते काढण्याचा अधिकार दिलेला आहे त्या संस्था म्हणजे कार्वी, सीएएमएस इन्शुरन्स रिपॉझिटरी, एनएसडीएल डेटाबेल मॅनेजमेंट आणि सेंट्रल इन्शुरन्स रिपॉझिटरी ऑफ इंडिया या संस्थांना हे खाते उघडण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

  विमा खाते उघडण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?

विमा प्राधिकरणाकडून ज्या चार संस्था नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यापैकी तुम्हाला खाते उघडण्यासाठी एका संस्थेची निवड करावी लागेल. त्यानंतर वेबसाईटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा लागेल.

आवश्यक केवायसी कागदपत्रे विमा कंपनीत जमा करावे लागतील किंवा अशी कागदपत्रे तुम्ही कुरिअरने देखील पाठवू शकतात. तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल व त्यानंतर सात दिवसात तुमचे ई विमा खाते निशुल्कपणे उघडण्यात येईल.

 कुठली कागदपत्रे लागतील?

ई विमा खाते उघडण्यासाठी पासपोर्ट आकारातील फोटो, पॅन कार्ड, ओळखपत्र, जन्मतारखेचा दाखला म्हणजेच जन्मतारीख प्रमाणपत्र, पत्याचा पुरावा म्हणून पत्त्याचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे लागतात.

 तुम्ही याआधी घेतलेली पॉलिसी डिजिटल स्वरूपात करायची असेल तर काय कराल?

आता या नवीन नियमानुसार तुम्ही यापुढे जे काही पॉलिसी घ्याल ती संपूर्ण डिजिटल स्वरूपामध्ये असणार आहे. परंतु यामध्ये आधी घेतलेल्या जुन्या पॉलिसींना जर डिजिटल स्वरूपामध्ये बदलून घ्यायचे असेल तर याकरिता पॉलिसीधारकांना पॉलिसी रूपांतरण अर्ज भरणे गरजेचे राहील.

याकरिता डाउनलोड करून भरलेला अर्ज ग्राहकाला विमा कंपनीच्या शाखेमध्ये जमा करावा लागेल. त्यानंतर पॉलिसीचे रूपांतरण डिजिटल स्वरूपामध्ये करण्यात येईल व तसा एसएमएस किंवा ई-मेल द्वारे माहिती संबंधित पॉलिसीधारकाला कळविण्यात येईल.