EPFO Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची संघटना असून खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या दृष्टिकोनातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची भूमिका फार महत्त्वपूर्ण असते.
कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याचे नियमन करण्याची महत्त्वाची जबाबदारी ही संघटना पार पाडत असते. त्यामुळे साहजिकच कर्मचाऱ्यांच्या या पीएफ खात्यासंबंधीचे नियम देखील या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून तयार व लागू केले जातात.
या दृष्टिकोनातुन पाहिले तर पीएफ खात्याच्या माध्यमातून लग्न किंवा घर बांधणे तसेच घराची खरेदी व महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय उपचाराकरिता आगाऊ पैसे काढता येतात. परंतु याकरिता काही नियम असून काही कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज असते.
या पैसे काढण्याच्या नियमांमध्ये आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक महत्त्वाचा बदल केला असून त्या बदलानुसार आता जर ईपीएफओचा सदस्य आजारी पडला तर त्याला उपचाराकरिता पीएफ खात्यामधून जास्त पैसे काढता येणार आहेत. म्हणजेच अशाप्रकारे आगाऊ पैसे काढण्यासाठी जो काही फॉर्म 31 भरावा लागत होता त्याच्या पॅरा 68 अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा आता दुप्पट केली आहे.
उपचाराकरिता आता खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा केली दुप्पट
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा फॉर्म 31 हा खूप महत्त्वाचा असून विविध कामांकरिता जर कर्मचाऱ्याला पीएफ खात्यांमधून वेळेपूर्वी पैसे काढायचे असतील तर तेव्हा त्याचा वापर होतो. या फॉर्ममध्ये विविध पॅरा असून त्यामध्ये विविध कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या फॉर्मच्या माध्यमातून लग्न, घराचे बांधकाम किंवा घराची खरेदी करणे, वैद्यकीय उपचार इत्यादीकरिता पैसे काढता येतात. या फॉर्ममधील पॅरा 68 हा उपचाराकरिता आंशिक रक्कम काढण्याची परवानगी पीएफ सदस्याला देतो. आता या अंतर्गत उपचाराकरिता जी काही रक्कम काढता येत होती त्याला काही मर्यादा होती व आता यामध्ये बदल करण्यात आला असून याकरिताचे मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे.
परंतु आता या नवीन नियमानुसार कर्मचारी सहा महिन्यांची बेसिक आणि डीए किंवा ईपीएफ योगदान आणि मिळालेल्या व्याजासह( जे कमी असेल) त्याचा हिस्सा काढू शकत नाही. तसेच दुसरी महत्वाची अट म्हणजे या रकमेपेक्षा जास्त रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात( एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त) असेल तरच त्याला रक्कम काढता येणार आहे.
याकरिता कोणत्याही सदस्याला पैसे काढायचे असतील तर त्यांना फॉर्म 31 सोबत प्रमाणपत्र सी जोडणे गरजेचे आहे व या प्रमाणपत्र सी मध्ये कर्मचारी आणि डॉक्टरची स्वाक्षरी असणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आता उपचाराकरिता पैशांची मर्यादा ही पन्नास हजार रुपयांवरून एक लाख रुपये इतकी केली आहे. त्यामुळे नक्कीच आता ईपीएफओच्या सदस्यांना दिलासा मिळणार आहे.