Pension Plans : निवृत्तीनंतर नियमित पेन्शन हवी असेल तर ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pension Plans : आतापसूनच भविष्याचा विचार करणे फार महत्वाचे बनले आहे. वाढती महागाई पाहता, गुंतवणूक ही खूप महत्वाची पायरी बनली आहे. जर तुम्हाला तुमचे भविष्य आरामात घालवायचे असेल तर गुंतवणूक खूप महत्वाची आहे. अशातच सरकार देखील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बचत योजना राबवत आहे. यात अनेक निवृत्ती योजना देखील आहेत.

अशातच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी देखील एका पेक्षा एक निवृत्ती योजना ऑफर करते. येथे तुम्हाला सेवानिवृत्तीनंतरचे नियमित उत्पन्न युनिट लिंक्ड विमा पॉलिसीद्वारे मिळू शकते. या बाजाराशी संबंधित योजना आहेत. युलिप हे विमा योजना आणि इक्विटी गुंतवणूक यांचे संयोजन आहे. यामध्ये गुंतवणुकीचा एक भाग विमा संरक्षणासाठी असतो. उर्वरित रक्कम इक्विटी गुंतवणूक आहे.

अशा योजनांमध्ये गुंतवणूक करून आणि योग्य SWP पर्याय निवडून, तुम्हाला नियमित मासिक उत्पन्नाच्या स्वरूपात पेन्शन मिळू शकते. यामध्ये एकूण 20 वर्षांच्या कालावधीत 10 वर्षांसाठी सुमारे 7 हजार ते 8 हजार रुपये प्रीमियम भरून सुमारे 30 हजार रुपये मासिक पेन्शन मिळवू शकता. चला या युलिप योजनाबद्दल जाणून घेऊया.

एलआयसी एंडोमेंट प्लस प्लॅन

90 दिवस ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकते. एलआयसीच्या या प्लॅनमध्ये 3 हजार रुपयांचा किमान प्रीमियम भरला जाऊ शकतो.

एसबीआय लाइफ स्मार्ट वेल्थ अ‍ॅश्युअर योजना

ही SBI लाइफ इन्शुरन्सची ULIP योजना आहे. यामध्ये 8 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक सुरू करू शकते. प्रीमियमची किमान रक्कम 4,166 रुपये आहे.

बजाज अलियान्झ फ्युचर गेन

या युलिपमध्येही गुंतवणूक करून नियमित उत्पन्न मिळवता येते. 1 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकते. किमान प्रीमियम रक्कम 2500 रुपये आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स

ही योजना आदित्य बिर्ला सनलाइफ इन्शुरन्सद्वारे ऑपरेट केली जाऊ शकते. 1 महिना ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकते. यामध्ये किमान 3 हजार रुपये प्रीमियम भरावा लागेल.