Personal Finance Deadlines : आधार लिंकसह ‘या’ महत्वाच्या कामांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत होती मुदत, जाणून घ्या आता काय होणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Personal Finance Deadlines : सरकारने काही महत्वाची कामं पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वेळ दिला होता. मात्र, सर्वसामान्यांची सोय लक्षात घेऊन यातील काही कामांची मुदत वाढवण्यात आली आहे. सरकारने म्युच्युअल फंड नामांकन, डी-मॅट नामांकन, आरबीआय अमृत महोत्सव एफडी, 2000 रुपयांची नोट बदलण्याची तारीख, आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. पण अशी अनेक कामे आहेत ज्यांची डेडलाइन बदललेली नाही. त्यामुळे वेळेत कामं पूर्ण न करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

बचत योजनेशी संबंधित आधार लिंक करणे

सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सारख्या छोट्या गुंतवणुकीला 30 सप्टेंबरपर्यंत आधारशी जोडणे अनिवार्य केले आहे. ज्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत असे केले नाही, त्यांची खाती आता गोठवली जाणार आहेत.

आयकर ऑडिट

आयकर विभागाने करदात्यांना ३० सप्टेंबरपर्यंत लेखापरीक्षण अहवाल सादर करावे, असे सांगितले होते. असे न करणाऱ्या लोकांना आता दंडासह जमा करता येणार आहे. आयकर विभागाने लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची मुदत वाढवली नाही.

एसबीआई वी-केयर

SBI ने SBI WeCare मधील गुंतवणुकीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 निश्चित केली होती. त्याच्या तारखेतही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच आता लोक या योजनेत गुंतवणूक करू शकणार नाहीत.

एलआयसी धन वृद्धी

LIC धन वृद्धी योजना देखील बंद करण्यात आली आहे. LIC ने या योजनेची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 निश्चित केली होती. त्याच्या तारखेतही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

TCS नवीन नियम

वित्त मंत्रालयाने 1 ऑक्टोबरपासून TCS मध्ये नवा नियम लागू केला आहे. त्यामुळे परदेश प्रवास सात लाख रुपयांनी महाग झाला आहे. आता प्रति व्यक्ती 7 लाख रुपयांपर्यंतच्या परदेशी टूर पॅकेजेसवर 5 टक्के दराने कर आकारला जाईल. त्यावर ३० सप्टेंबरपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नव्हता.