Personal Loan: पर्सनल लोन घेऊन भविष्यात होणारा पश्चाताप टाळायचा असेल तर ‘या’ गोष्टींचे घ्या काळजी! होईल फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Personal Loan:- जीवन जगत असताना अनेक आपत्कालीन आर्थिक गरजा उद्भवतात व प्रत्येक वेळी आपल्याकडे पैसा असतो असे नाही. त्यामुळे आपल्याला मित्र किंवा नातेवाईक असे इतर काही मार्गाने उसने किंवा कर्जरूपाने पैसा घ्यावा लागतो. यामध्ये जर आपण बँकांचा विचार केला तर बरेच जण पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज घेण्यावर भर देतात.

परंतु बँकांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कर्जाचे अनेक प्रकारच्या अटी व नियम देखील असतात व हे अटी व नियम आपण समजून घेऊनच कर्ज घेणे फायद्याचे ठरते. पर्सनल लोनचा विचार केला तर याबाबतीत देखील अनेक महत्त्वाचे मुद्दे असतात व हे मुद्दे आपण बँकेच्या माध्यमातून जाणून घेऊन पर्सनल लोन घ्यावे की नाही याबाबतचा विचार करू शकतो. नाहीतर पर्सनल लोन घेऊन भविष्यात कर्जाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता जास्त वाढते. याच अनुषंगाने तुम्हाला जर पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्ही बँकेला काय प्रश्न विचारणे गरजेचे आहे? ते पाहू.

 पर्सनल लोन घ्या परंतु बँकेला हे प्रश्न विचारा

1- व्याजदरा विषयी माहिती घ्या पर्सनल लोन घ्यायचे असेल तर त्या अगोदर त्या लोनचा व्याजदर फिक्सड आहे की फ्लोटिंग आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच तुमचा महिन्याचे पेमेंट काय आहे आणि त्यावर त्याचा काय परिणाम होईल हे देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे. यामध्ये फिक्सड व्याजदर म्हणजे जो कर्ज घेताना ठरवला जातो आणि कर्जाचा संपूर्ण कालावधीत तोच व्याजदर राहतो. रिझर्व बॅंकेच्या माध्यमातून जर व्याजदरात बदल केला गेला तरी देखील हा व्याजदर बदलत नाही. परंतु रिझर्व बँकेच्या माध्यमातून जेव्हा रेपो रेट मध्ये बदल केला जातो त्यानुसार जो व्याजदर बदलतो त्याला फ्लोटिंग व्याजदर असे म्हणतात. फ्लोटिंग व्याजदराचे जर आपण फायदे पाहिले तर रेपोदर कमी झाल्यास व्याजदर देखील कमी होतो. तसेच रिझर्व बँकेच्या माध्यमातून रेपो रेट वाढवण्यात आला तर व्याजदर देखील वाढतो. त्यामुळे व्याजदराचा प्रकार जाणून घेणे गरजेचे आहे.

2- कर्जाचा कालावधी तुम्ही घेत असलेल्या कर्जाचा कालावधी आणि परतफेडीसाठी चा कालावधी नेमका किती आहे? याची माहिती घेणे खूप गरजेचे आहे. पर्सनल लोन हे काही महिने ते अनेक वर्षांपर्यंत वेगवेगळ्या कर्जाच्या अटीसह मिळते. तुम्ही जर जास्तीत जास्त म्हणजेच दीर्घ कालावधी करता पर्सनल लोन घेतले असेल तर तुमची ईएमआय ची रक्कम कमी होते.

3- बँकेकडून लागणारे चार्जेस आणि फी पर्सनल लोन घेताना व्याजदर जितका महत्त्वाचा आहे तितका त्यासाठी लागणारी फी आणि शुल्क देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या चार्जेसमध्ये प्रक्रिया तसेच प्री पेमेंट पेनल्टी आणि लेट पेमेंट फी यांचा समावेश असू शकतो. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी या सर्व शुल्काबद्दल माहिती घेणे गरजेचे आहे.

4- लोन सुरक्षित आहे की असुरक्षित हे जाणणे कर्ज घेण्या अगोदर ते सुरक्षित आहे की असुरक्षित आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. कर्जदार सुरक्षित प्रकारातील असेल तर व्याजदर कमी असू शकतो. परंतु जर असे कर्ज आपण डिफॉल्ट केले तर आपले कोलॅटरल गमावण्याचा आपल्याला धोका संभवतो. कर्ज जर असुरक्षित असेल तर यावर सहसा व्याजदर जास्त असतो.

5- लोन प्रीपेमेंट बँका किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून निर्धारित कालावधीपूर्वी पर्सनल लोनची रक्कम परत करण्यासाठी प्री पेमेंट शुल्क आकारले जाते. समजा तुम्ही जास्तीत जास्त पेमेंट करण्याची किंवा कर्जाची जी काही मुदत आहे त्याच्या अगोदर कर्ज परतफेड करण्याची योजना करत असाल तर प्री पेमेंट पेनल्टी बद्दल बँकेकडे चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच कर्ज घेण्यापूर्वी कर्जाविषयीची प्री क्लोजर प्रक्रिया तसेच इतर शुल्काबद्दल माहिती घेणे देखील महत्त्वाचे आहे.

त्यामुळे वरील माहिती जर तुम्ही बँकेला विचारली व त्यानंतर कर्ज घेतले तर तुम्ही भविष्यातील होणाऱ्या पश्चातापापासून वाचू शकतात व आर्थिक नुकसान टाळू शकतात.