Personal Loans : पर्सनल लोन घेताय?; ‘हे’ तीन पर्याय ठरतील उत्तम !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Personal Loans : जेव्हा-जेव्हा लोकांना अचानक पैशांची गरज भासते तेव्हा लोक वैयक्तिक कर्ज घेतात. पण वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जापेक्षा खूप महाग असते. पण तुम्हाला माहित आहे का की, पर्सनल लोन ऑप्शन्सऐवजी तुम्ही इतर काही पर्याय देखील निवडू शकता. जिथे तुम्हाला स्वस्त दारात कर्ज मिळू शकेल. हे असे पर्याय असे आहेत जे तुमच्या खिशावर कमी परिणाम करतील. शिवाय कर्जही लवकर मिळेल आणि व्याजही कमी भरावे लागेल. कोणते आहेत हे पर्याय चला पाहूया…

FD वर कर्ज

तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही केलेल्या एफडीवर देखील कर्ज घेऊ शकता. तुम्ही तुमच्या एफडीच्या मूल्याच्या 90 ते 95 टक्के रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची गरज भासत नाही. तसेच या कर्जासाठी तुम्हाला प्रोसेसिंग फी देखील भरावी लागत नाही. FD वर मिळणाऱ्या व्याजापेक्षा एक किंवा दोन टक्के जास्त दराने व्याज द्यावे लागेल. त्यामुळे वैयक्तिक कर्जापेक्षा ते स्वस्त आहे.

पीपीएफ वर कर्ज

जर तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंडातही गुंतवणूक केली असेल, तर तुम्ही यावरही कर्ज घेऊ शकता. मात्र यासाठी तुमचे पीपीएफ खाते किमान एक वर्ष जुने असले पाहिजे. तुमच्या खात्यात जमा झालेल्या रकमेच्या आधारेच तुम्हाला कर्ज दिले जाते.

पीपीएफवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा एक किंवा दोन टक्के अधिक व्याजदर द्यावा लागतो. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के दराने व्याज दिले जात आहे. म्हणजेच पीपीएफ कर्जावर ८.१ टक्के दराने व्याज द्यावे लागेल.

सोने कर्ज

जर तुमच्याकडे एफडी किंवा पीपीएफ खाते नसेल तर तुम्ही गोल्ड लोन देखील घेऊ शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर 3 लाख रुपयांपर्यंतचे सोने कर्ज घेतले असेल तर तुम्हाला त्यावर कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही. हे अत्यंत सुरक्षित कर्ज मानले जाते. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8.70% दराने गोल्ड लोन दिले जाते. जे वैयक्तिक कर्जापेक्षा कमी आहे.