PhonePe Loan: फोन पे वरून देखील मिळते तुम्हाला ताबडतोब 5 लाखापर्यंत कर्ज! वाचा या कर्जासंबंधी ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
phone pe loan

PhonePe Loan:- फोन पे या मोबाईल ॲप्लिकेशन बद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे एक डिजिटल पेमेंट एप्लीकेशन असून या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून युजर्सला अनेक प्रकारच्या सुविधा मिळत असते. या फोन पे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे तसेच मोबाईल किंवा डीटीएच रिचार्ज, फास्टटॅग भरणे किंवा वीज बिलाचा भरणा इत्यादी बाबी तुम्ही करू शकतात.

एवढेच नाही तर तुम्ही या माध्यमातून 1000 पेक्षा जास्त ऑनलाईन प्लेटफॉर्मवर पेमेंट देखील करू शकतात. फोन पे ॲप्लिकेशन हे फ्लिपकार्टने लॉन्च केलेले असून आज जगभरात मोठ्या संख्येने या फोन पे ॲप्लिकेशनची युजर आहेत. यासोबतच तुम्हाला फोन पे च्या माध्यमातून कर्ज देखील घेता येते.

फोन पे च्या माध्यमातून तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला काही फोन पे चा भागीदारी कंपन्यांची मदत घ्यावी लागते व त्यांच्या मदतीने हे ॲप्लिकेशन तुम्हाला कर्ज देण्याचे सुविधा पुरवते. यामध्ये फोन पे च्या माध्यमातून तुम्ही मनी व्ह्यू  किंवा बजाज फिन्सर्व यासारख्या एनबीएफसी कडून कर्ज घेऊ शकतात.

यामध्ये फोन पे तुमचा अर्ज या कंपन्यांकडे कर्जासाठी पाठवतो व या कंपन्यांच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज दिले जाते. याकरिता तुम्हाला फोन पे च्या बिजनेस एप्लीकेशन वर नोंदणी करणे गरजेचे असते. यामध्ये दिल्या गेलेल्या गेट लोनवर टॅप करावे लागते. यानंतर कर्जाची रक्कम तसेच व्याजदर व कर्जाचा कालावधी, तुमच्या बँक खात्याचा तपशील वगैरे भरून तुम्हाला तुमच्या गरजेनुसार कर्ज मिळते.

फोन पे कडून तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर सगळ्यात अगोदर फोन पे बिजनेस एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करून नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला बँक खाते क्रमांक ऍड बँक अकाउंट सोबत लिंक करावे लागेल व त्यानंतर होम पेजवर येऊन कर्ज परतफेड विभागावर क्लिक करावे लागेल.

या ठिकाणी तुम्हाला बजाज फिन्सर्व होम क्रेडिट, मनी व्ह्यू मनी टॅप इत्यादी प्लॅटफॉर्म बघायला मिळतील. त्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन परत गुगल प्ले स्टोअर वरून इंस्टॉल करावे लागतील आणि त्यानंतर या एप्लीकेशन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला नोंदणी करून कर्ज घेता येईल.

 सोप्या पद्धतीने समजून घ्या स्टेप्स

1- सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून फोन पे बिजनेस ॲप इंस्टॉल करावे लागेल.

2- तसेच तुमचा मोबाईल नंबरने नोंदणी पूर्ण करावी लागेल.

3- यानंतर तुमचे बँक खाते यूपीआयशीसी लिंक करा.

4- त्यानंतर सी ऑल ऑन रिचार्ज  अँड बिल्स या पर्यायावर क्लिक करा.

5- त्यानंतर लोन रिपेमेंट ऑन फायनान्शिअल सर्विसेस अँड टॅक्सेस या पर्यायावर क्लिक करा.

6- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही कंपन्यांची नावे दिसतील जसे की बजाज फायनान्स लिमिटेड, होम क्रेडिट, मनी व्ह्यू यासह इतर कंपन्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. यातील तुम्हाला कुठलेही एक मोबाईल ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वरून इंस्टॉल करावे लागेल.

7- समजा तुम्ही मनीव्हिव मोबाईल ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले तर तुमच्या मोबाईल नंबर ने तुम्हाला मनी व्हिवमध्ये नोंदणी करावी लागेल जो मोबाईल नंबर फोन पे मध्ये नोंदणी केलेला आहे तो नंबर या ठिकाणी वापरावा लागेल.

8- त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, पत्ता आणि वैयक्तिक तपशील इत्यादी माहिती अचूक भरावी लागेल.

9- त्यानंतर तुम्हाला परवडेल व आवडेल अशी कर्ज योजनेची निवड करावी लागेल.

10- ही निवड केल्यानंतर तुम्हाला आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागेल.

11- त्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर तुमच्या बँक खात्यात त्वरित कर्जाचे पैसे बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात.

 फोन पे कडून कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्र

फोन पे वरून कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मागील तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट, तुमचा चालू पत्त्याचा पुरावा जसे की इलेक्ट्रिक बिल किंवा रेशन कार्ड व एक सेल्फी इत्यादी आवश्यक असते.

 फोन पे वरून मिळणाऱ्या कर्जाचे स्वरूप कसे असते?

समजा तुम्ही फोन पे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मनी व्हिव एप्लीकेशन वरून कर्ज घेतले तर तुम्हाला दहा हजार ते पाच लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. या कर्ज परतफेडीचा कालावधी तीन महिने ते पाच वर्षापर्यंत आहे. वार्षिक व्याजदर 16 ते 39 टक्क्यांच्या दरम्यान असून प्रक्रिया शुल्क हे दोन टक्के ते आठ टक्के इतके आहे.

 फोन पे  वरून कर्ज घेण्यासाठीची पात्रता

1- सर्वप्रथम म्हणजे कर्ज घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.

2- फोन पे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे.

3- फोन पे वरून कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे केवायसी कागदपत्रे असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड व पॅन कार्ड असणे गरजेचे आहे नाहीतर तुम्हाला कर्ज मिळणार नाही.

4- मंजूर कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी तुमच्याकडे कार्यरत बँक खाते क्रमांक असणे गरजेचे आहे. कर्जाची रक्कम मिळवण्याकरिता तुम्हाला बँक खाते क्रमांक सोबतच आयएफएससी कोड तसेच इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड यासारखा तपशील देखील भरावा लागू शकतो. यासोबतच आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

5- यासोबतच तुमच्याकडे आयटीआर स्लीप, सॅलरी लीप सारखी कागदपत्रे मागू शकतात. कर्जाची रक्कम जास्त असेल तर याकरिता ही कागदपत्रे लागतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe