Post Office : पोस्टाची जबरदस्त योजना ! 25 वर्षातच करेल करोडपती !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office : पोस्टाकडून सामान्य ग्राहकांसाठी एकापेक्षा योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये गुंतवणूक करून सामान्य व्यक्ती भविष्यात श्रीमंत होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो. पोस्टात दीर्घकालीन गुंतवणूक करून तुम्ही भविष्यात सहज श्रीमंत होऊ शकता. अशातच आज आम्ही पोस्टाची अशीच एक स्कीम घेऊन आलो जिथे गुंतवणूक करून तुम्ही सहज मोठा निधी गोळा करू शकता.

पोस्टाच्या या योजनेतून तुम्ही फक्त श्रीमंत होण्याचे नाही तर करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. यामध्ये रिटर्न्सच्या हमीसोबतच कर सवलतीचा लाभही मिळतो. या योजनेंतर्गत तुम्ही 25 वर्षात 1 कोटी रुपयांचा निधी सहज तयार करून शकता. पोस्टाची ही योजना कोणती आहे? आणि या योजनेचे व्याजदर याबद्दल आपण सर्वकाही जाणून घेणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या या विशेष योजनेचे नाव आहे “सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)”. ही दीर्घकालीन छोटी बचत योजना आहे. त्याचे व्याजदर सरकार ठरवते, ज्याची गणना दरवर्षी केली जाते. दर तीन महिन्यांनी याचा व्याजदर बदलत राहतो. सध्या त्यावर ७.१% चक्रवाढ व्याज उपलब्ध आहे.

गुंतवणुकीच्या रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही. कोणताही भारतीय याचा लाभ घेऊ शकतो. यात 5 वर्षांचा लॉक इन कालावधी आहे. गरज भासल्यास गुंतवणूकदार कर्जासाठी अर्जही करू शकतात. उपलब्ध कमाल कर्ज ठेव रकमेच्या 25% आहे, त्याचा व्याज दर 1% आहे.

अशाप्रकारे तयार करा एक कोटी रुपयांचा निधी

PPF फक्त 500 रुपयांपासून सुरू करता येईल. गुंतवणुकीची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपये प्रति वर्ष आहे. जर एखाद्या व्यक्तीने या योजनेअंतर्गत 25 वर्षांसाठी 12,500 रुपये जमा केले तर 1.02 कोटी रुपयांचा निधी तयार होतो. त्याच वेळी, दरमहा 1000 रुपये गुंतवून 8.17 लाख रुपयांचा निधी तयार केला जाऊ शकतो.

पीपीएफशी संबंधित नियमांमध्ये बदल !

अलीकडेच सरकारने पीपीएफ, ज्येष्ठ नागरिक योजना आणि टाइम डिपॉझिट योजनेच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. नवीन नियमांनुसार, PPF खात्यातून 5 वर्षांचा कालावधी चार वर्षांनी काढल्यासच लागू व्याजाचा लाभ मिळेल. सध्या तीन वर्षांनी पैसे काढल्यावरच व्याजाचा लाभ मिळतो.