Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनेत पाच वर्षात मिळेल 4.5 लाख व्याज! किती करावी लागेल गुंतवणूक?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टीतून पाहिले तर अनेक योजना असून यामध्ये बरेच जण गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येतात. गुंतवणूक करताना कोणताही गुंतवणूकदार हा सर्वप्रथम गुंतवणुकीचे सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या गोष्टींना प्राधान्य देतो.

त्यामुळे या अनुषंगाने बँकांच्या विविध मुदत ठेव योजना, एलआयसी आणि म्युच्युअल फंड एसआयपी यासारख्या गुंतवणूक पर्यायांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार पसंती देतात. या खालोखाल पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांना देखील गुंतवणूकदारांकडून पसंती दिली जाते.

पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक अशा योजना आहेत की त्या सुरक्षित गुंतवणुकी सोबतच उच्च व्याजाची देखील हमी देतात. या योजनांमध्ये जर आपण पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट अर्थात एनएससी ही योजना पाहिली तर ही देखील उच्च व्याजाची हमी देणारी योजना आहे. याच योजनेविषयीची माहिती आपण या लेखात घेऊ.

 पोस्टाची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना आहे महत्त्वाची

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना ही एक प्रकारची डिपॉझिट योजना असून यामध्ये जर तुम्ही पाच वर्षांकरिता पैसे जमा केले तर या माध्यमातून चांगल्या पद्धतीने तुम्हाला व्याज मिळू शकते. सध्या या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 7.7% दराने व्याज दिले जात आहे.

या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. यामध्ये कोणत्याही नागरिकाला खाते उघडता येते व या योजनेत संयुक्त खात्याची देखील सुविधा देण्यात आलेली आहे. पालक अल्पवयीन मुलांच्या नावावर गुंतवणूक करू शकतात व दहा वर्षापर्यंतची मुले स्वतःच्या नावावर या योजनेत खाते सुरू करू शकतात.

 या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये

या योजनेच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला जास्त कालावधी करिता पैसे जमा करणे गरजेचे नसते. कारण या योजनेचा परिपक्वता कालावधी पाच वर्षाचा आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याजाचा लाभ देण्यात येतो आणि त्यासोबतच हमी परतावा देखील उपलब्ध आहे.

तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता त्यावेळी जो काही व्याजदर लागू आहे त्यानुसारच तुम्हाला पाच वर्षासाठीचा व्याजदर दिला जातो. म्हणजेच मध्यंतरीच्या कालावधीमध्ये व्याजदर कमी झाला किंवा वाढला तरी तुमच्या खात्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

तसेच यामध्ये जमा केलेल्या रकमेवर 80C अंतर्गत कर सवलत देखील उपलब्ध आहे. साधारणपणे दरवर्षी एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंतचे ठेवींवर  तुम्हाला करात सुट दिली जाते. तसेच दुसरे म्हणजे यामध्ये तुम्हाला पार्शल विड्रॉलची सुविधा मिळत नाही. म्हणजेच संपूर्ण पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला रक्कम काढता येते.

 दहा लाख रुपये पाच वर्षाकरिता गुंतवले तर किती मिळतो परतावा?

या योजनेमध्ये जर तुम्ही दहा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला व्याजापोटी चार लाख 49 हजार 34 रुपये मिळतात व पाच वर्षानंतर तुम्ही एकूण तुम्ही गुंतवलेले दहा लाख आणि व्याजापोटी मिळणारे चार लाख 49 हजार 34 रुपये मिळून तुम्हाला 14 लाख 49 हजार 34 रुपये मिळतात. म्हणजे जवळपास दहा लाख गुंतवणुकीतून तुम्ही पाच वर्षात साधारणपणे साडेचार लाख रुपये या योजनेतून मिळवू शकतात.