Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये कराल गुंतवणूक तर मिळेल भरमसाठ पैसा, वाचा योजनांची माहिती

Ajay Patil
Published:
post office scheme

Post Office Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा मिळवण्याच्या अनुषंगाने ज्याप्रमाणे बँकांच्या मुदत ठेव योजनांना प्राधान्य दिले जाते अगदी त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या योजनांना देखील तितकेच प्राधान्य दिले जाते.

कारण पोस्ट ऑफिसच्या देखील अल्पबचत योजना तर आहेतच परंतु त्या व्यतिरिक्त मुदत ठेव व इतर योजना असून या माध्यमातून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक आकर्षक अशा बचत योजना राबवल्या जातात

व या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून त्यावर चांगला व्याजाचा लाभ मिळवून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. त्यामुळे या लेखात आपण पोस्ट ऑफिसच्या अशा महत्त्वाच्या योजनाची माहिती घेणार आहोत ज्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत.

 चांगला परतावा देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या योजना

1- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना ही

पोस्ट ऑफिसची महत्त्वपूर्ण योजना असून ही एक छोटी बचत योजना आहे. या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 7.7 टक्के व्याज दिले जाते. तसेच दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला सूट देण्यात आली आहे. देशातील पोस्ट ऑफिसच्या कुठल्याही शाखेमध्ये तुम्ही या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात.

2- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजना ही पोस्ट ऑफिसची एक महत्वपूर्ण योजना असून यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी पाचशे रुपयांपासून तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात व जास्तीत जास्त या योजनेत दीड लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. महत्वाचे म्हणजे पंधरा वर्षाच्या गुंतवणूक कालावधीनंतर तुम्ही परत पाच वर्षाकरिता या योजनेत वाढ करून गुंतवणूक करू शकतात.

या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आयकर कलम 80c अंतर्गत कर लाभ देखील मिळतो व महत्त्वाचे म्हणजे एखादी अचानकपणे पैशांची गरज उद्भवली तर तुम्ही तुमच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेच्या खात्यातून पैसे देखील काढू शकतात. तसेच या खात्यातील तुमच्या जमा रकमेवर तुम्ही कर्जाची सुविधा देखील मिळवू शकतात.

3- नॅशनल सेविंग टाईम डिपॉझिट अकाउंट पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही पैशांची गुंतवणूक करून चांगला व्याजदराचा लाभ मिळवून उत्तम परतावा मिळवू शकतात. या योजनेअंतर्गत वार्षिक 6.9%, दोन वर्षांकरिता सात तर तीन वर्षांकरिता 7.1% व पाच वर्षांकरिता 7.5% व्याजदर मिळतो.

कमीत कमी एक हजार रुपयांची गुंतवणूक या योजनेत करू शकतात. या योजनेमध्ये गुंतवणूक सुरू केल्यानंतर सहा महिन्याच्या अगोदर तुम्ही पैसे काढू शकत नाहीत. एक वर्ष होण्याच्या आधी जर तुम्ही पैसे काढले तर बचत खात्याला जितका व्याजदर मिळतो तितकाच व्याजदर त्यामुळे मिळतो.

4- किसान विकास पत्र योजना पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेमध्ये तुम्ही पैसे जमा करायला सुरुवात केली तर तुम्हाला वार्षिक 7.5 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत 9 वर्ष आणि 7 महिन्यात तुमची गुंतवलेली रक्कम दुप्पट होते.

अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेअंतर्गत खाते उघडू शकते  व अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने त्याचे पालक या योजनेत खाते उघडू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe