Post Office Scheme : पोस्टाच्या या योजनेत 1 लाख गुंतवल्यास मिळेल इतका फायदा, बँकेच्या एफडीपेक्षा मिळते जास्त व्याज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अनेक जण कष्टाने कमावलेल्या पैशांची बचत करतात व बँक, एलआयसी, शेअर मार्केट तसेच म्युच्युअल फंडच्या अनेक एसआयपी मध्ये गुंतवणूक करतात. कुठलाही गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याकरिता मिळणारा परतावा आणि केलेल्या गुंतवणुकीचे सुरक्षितता या बाबींवर प्रामुख्याने लक्ष देतात. याच अनुषंगाने जर आपण विचार केला तर पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक बचत योजना असून त्या लोकांसाठी खूप फायद्याचे आहेत.

अशा योजना फायदेशीर आणि आकर्षक व्हाव्यात याकरिता सरकार त्यांच्या व्याजदरांमध्ये वेळोवेळी बदल करत असते. पोस्ट ऑफिसच्या योजनांचा विचार केला तर ते विविध वयोगटातील व्यक्तींसाठी असून त्या त्या योजनांची वैशिष्ट्ये वेगवेगळे आहेत. अशीच एक पोस्ट ऑफिस ची ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची बचत खाते योजना असून  या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना बँकाच्या एफडीपेक्षा जास्तीचे व्याज मिळते.

 या योजनेत मिळते आकर्षक व्याज

ही पोस्ट ऑफिसची एक महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी योजना असून ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजनेत आकर्षक व्याजदर देखील दिला जातो. या योजनेवर वार्षिक 8.2% व्याज दिले जाते. समजा तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक आहात आणि चांगल्या परताव्यास सुरक्षित गुंतवणूक करायचे असेल तर ही योजना खूप महत्त्वाची आहे.

 या योजनेत किती करता येते जास्तीत जास्त गुंतवणूक

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजनेमध्ये फक्त एक हजार रुपयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खाते उघडता येते. या योजनेमध्ये कमाल 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 8.2% दराने व्याज देण्यात येते. जर आपण या व्याजदराचा देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्याजदराचा विचार केला तर तो ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षाच्या एफडीवर साडेसात टक्के देण्यात येत आहे.

म्हणजे पोस्ट ऑफिस च्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये स्टेट बँकेपेक्षा देखील जास्त व्याज देण्यात येते. पोस्ट ऑफिस जेष्ठ नागरिक योजनेत 80c अंतर्गत सूट मिळत आहे. म्हणजेच एक लाख 50 हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करून तुम्हाला करात सूट मिळू शकते. परंतु मिळणाऱ्या व्याजावर मात्र कर भरावा लागतो.

या योजनेत खाते उघडायचे असेल तर कोणत्याही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ते उघडता येणे शक्य आहे. साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयानंतर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडता येते. परंतु यामध्ये 55 वर्षापेक्षा जास्त परंतु साठ वर्षापेक्षा कमी वयाचे व्हीआरएस घेणारे देखील हे खाते उघडू शकतात. पन्नास वर्षावरील आणि साठ वर्षापेक्षा कमी वयाचे संरक्षण निवृत्त व्यक्ती देखील या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

 पाच वर्षाच्या गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन

समजा तुम्ही या योजनेमध्ये एक लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षानंतर तुम्हाला एक लाख 50 हजार 471 रुपये परतावा मिळेल आणि दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तीन लाख 943 रुपये मिळतात. या योजनेमध्ये पाच वर्षाकरिता गुंतवणूक करणे गरजेचे असून पाच वर्षांपूर्वी खाते बंद करता येऊ शकते. परंतु यामध्ये तुम्ही जर असं केले तर तुम्हाला दंड भरावा लागतो.