Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची सुपरहिट योजना ! फक्त व्याजातूनच व्हाल मालामाल !

Sonali Shelar
Published:
Post Office Time Deposit Scheme

Post Office Time Deposit Scheme : प्रत्येकजण आपल्या कमाईचा काही भाग वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि कुठेतरी गुंतवणूक करतो, जेणेकरून भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये. आज बाजारात अनेक योजना आहेत. अशातच भारतीय पोस्ट ऑफिसकडून अनेक प्रकारच्या बचत योजना चालवल्या जातात जिथे गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळतो.

FD सारख्या योजना नेहमीच गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय मानला जातो. बहुतेक सर्व बँका FD म्हणजेच मुदत ठेवीचा पर्याय देतात. इथे तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्हालाही तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, जर तुम्ही चांगल्या परताव्याची योजना शोधत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये खाते उघडू शकता.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट हा पोस्ट ऑफिस एफडीचा प्रकार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी FD चा पर्याय मिळतो. जर तुम्ही यामध्ये 10 वर्षांसाठी पैसे जमा केले तर तुमची रक्कम दुप्पट होऊ शकते. सध्या 5 वर्षांच्या एफडीवर 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे.

तुम्ही दुप्पट व्याज कसे मिळवू शकता

सध्या पोस्ट ऑफिस एफडीवर 7.5 टक्के व्याजदर आहे. समजा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 5 लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला त्यावर 7.5 टक्के दराने अंदाजे 2 लाख रुपये व्याज मिळेल. अशाप्रकारे तुमची रक्कम 5 वर्षांत 7 लाख रुपये होईल. आता तुम्ही ते पुन्हा 5 वर्षांसाठी जमा केल्यास ही रक्कम सुमारे 10 लाख रुपये होईल.

एक ते पाच वर्षांच्या FD वरील व्याजदर

1 वर्षासाठी निश्चित व्याज – 6.9%

2 वर्षांसाठी निश्चित व्याज – 7.0%

3 वर्षांसाठी निश्चित व्याज – ७.०%

5 वर्षांसाठी निश्चित व्याज – 7.5%

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe