Mutual Funds Investment : पैशांचा पाऊस 10 वर्षात 740% रिटर्न देणारे ‘हे’ आहेत 5 फ्लेक्सिकॅप फंड, पहा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mutual Funds Investment : सध्या म्युच्यअल फंड चांगलेच फॉर्म मध्ये आले आहेत. यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. अनेक तरुण सध्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहेत. परंतु अनेक लोक आजही यात गुंतवणुकीस घाबरत असतात. याचे कारण म्हणजे अस्थिर असणारे मार्केट. तुम्हीही यातील एक असाल तर तुमच्यासाठी फ्लेक्सिकॅप फंड हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतात.

फ्लेक्सिकॅप फंड

फ्लेक्सिकॅप फंडात पैसे जर तुम्ही गुंतवले तर तुम्हाला तुमचे पैसे लार्ज कॅप, मिड कॅपमध्ये गुंतवायचे की स्मॉल कॅपमध्ये गुंतवायचे असा तुमचा गोंधळ राहणार नाही. याद्वारे तुम्ही सर्व प्रकारच्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्सिंग करू शकता.

गुंतवणूक बाबतची रिस्क कमी

फ्लेक्सिकॅप फंड म्हणजे म्युच्युअल फंडाचीच एक अशी कॅटेगिरी आहे, जी ओपन-एंडेड डायनॅमिक इक्विटी योजना आहे. यातील पैसे लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुंतवले जातात. यातून तुमची गुंतवणूक बाबतची रिस्क कमी होत जाते.

फ्लेक्सी कॅप फंड विषयी आणखी माहिती

गुंतवणुकीवर रिस्क नको असणाऱ्या लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. फ्लेक्सी कॅप फंड हे एक प्रकारचे इक्विटी म्युच्युअल फंड आहेत. यात प्रचंड लवचिकता असते. यामध्ये अफन्ड मॅनेजर वेगवेगळ्या बाजार भांडवलाच्या विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतात.

म्हणजेच लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपसह सर्व प्रकारचे स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट होऊन जातात. विशेष म्हणजे बाजाराच्या परिस्थितीनुसार ते आपला फंड विविध ठिकाणी वळवून घेतात.

तोटा कमी होईल व तुमचे पैसे वाढत जातील

जर लार्जकॅपमध्ये भीती असेल तर तेथून काही पैसे मिडकॅप किंवा स्मॉलकॅपमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात. किंवा मिडकॅपमधून लार्जकॅपमध्ये पैसे वळवले जातात. म्हणजे मार्केटच्या स्थितीनुसार पैसे वळवले जातात जेणे करून तुम्हाला तोटा कमी होईल व तुमचे पैसे वाढत जातील. .

सर्वात जास्त रिटर्न देणाऱ्या स्कीम

यामध्ये Quant Flexi Cap: 24% , Nippon Ind Focused Eqt: 21% यांसोबतच JM Flexicap: 20%, Parag Parikh Flexi Cap: 20% यांचाही समावेश आहे. Franklin Ind Focused Eqt: 19.62% SBI Focused Eqt: 18.75% यांनीही जबरदस्त रिटर्न दिले आहेत.