RBI MPC Meet: अजून महाग होणार लोन EMI? पुढील आठवड्यात RBI व्याजदरात पुन्हा वाढ करू शकते, जाणून घ्या का?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI MPC Meet: देशात महागाई (Inflation) खूप वर पोहोचली आहे. ती खाली आणण्यासाठी सरकार आपल्या स्तरावर अनेक प्रयत्न करत आहे. दरम्यान रिझर्व्ह बँके (Reserve Bank) च्या चलनविषयक धोरण समितीची बैठकही पुढील आठवड्यात होणार आहे.

अशा स्थितीत आरबीआय पुन्हा एकदा धोरणात्मक व्याजदर (Policy interest rates) वाढवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा परिणाम असा होईल की कर्जाची ईएमआय पुन्हा एकदा महाग होऊ शकते.

रेपो दरात 0.40% वाढ होऊ शकते –
चलनविषयक धोरण समितीची बैठक 6 ते 9 जून या कालावधीत होणार आहे. एप्रिलमध्ये झालेल्या शेवटच्या बैठकीत एमपीसी (MPC) ने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही, परंतु मे महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयने एमपीसीची तातडीची बैठक बोलावून व्याजदरात 0.40% वाढ केली होती. पीटीआयने ब्रोकरेज एजन्सी BofA सिक्युरिटीजचा हवाला देत अहवाल दिला आहे की यावेळी देखील RBI रेपो दर 0.40% ने वाढवू शकते.

टोमॅटोची महागाई वाढली –
बोफा सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की टोमॅटोच्या किमतीमुळे मे महिन्यात पुन्हा महागाई वाढली आहे. कोर महागाई दर 7.1% वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आरबीआयचे व्याजदर वाढणे जवळपास निश्चित आहे. तथापि, सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर (Taxes on petrol and diesel) कमी करण्यासाठी, क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात शुल्कमुक्त करण्यासाठी आणि विमान इंधनाच्या (ATF) किमती कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.

भविष्यात लोन अधिक महाग होईल –
बातम्यांमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, येत्या काही महिन्यांत RBI पुन्हा एकदा ऑगस्टमध्ये व्याजदर 0.35% वरून 0.50% पर्यंत वाढवू शकते. रेपो दर (Repo rate) असाच वाढत राहिला तर येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांसाठी कर्जाच्या ईएमआयचा बोजा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या अहवालात महागाई वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, किरकोळ महागाई सरासरी 6.8% राहण्याची शक्यता आहे, जी आरबीआयच्या 2 ते 6 टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. चलनवाढीचा दर उच्च राहिल्यास आरबीआय चालू आर्थिक वर्षात व्याजदर 5.65% पर्यंत नेऊ शकते. सध्या रेपो दर 4.40% आहे.