मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा एक उत्तम प्रकार असून अनेक जण पोस्ट ऑफिसच्या विविध योजना आणि बँकांमध्ये एफडी करत असतात. आपल्याला माहित आहे की अशा प्रकारची फिक्स डिपॉझिट ही काही वर्षांकरिता केली जाते. परंतु अचानकपणे जर आपल्याला मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज उद्भवल्यास आपण आर्थिक समस्यामध्ये अडकतो व नेमका आता पैसा कुठून उभा करावा या विचारात असतो.
त्यामुळे बरेच जण बचत केलेला जो काही पैसा असतो तो वापरतात किंवा कर्ज तरी घेतात. परंतु अशावेळी तुम्ही फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी केली असेल व अशा प्रकारची अचानक पैशाची गरज तुम्हाला उद्भवली व ती गरज भागवण्यासाठी जर तुम्ही एफडी तोडण्याचा विचार करत असाल किंवा केलेल्या एफडीवर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्या अगोदर कोणत्या गोष्टींमध्ये तुमचे नुकसान आहे किंवा फायदा आहे हे तुम्ही समजून घेणे गरजेचे आहे.
पैशांच्या गरजेवेळी एफडी तोडावी की एफडी वर कर्ज घ्यावे?
समजा तुम्ही दोन वर्षांच्या कालावधी करिता काही रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली आहे व त्यावर तुम्हाला सात टक्क्यांचे व्याज मिळत आहे किंवा 6.5 टक्के व्याज तुम्हाला एक वर्षाच्या एफडीवर बँक देत आहे. अशाप्रसंगी तुम्हाला पैशांची गरज उद्भवली व ती गरज भागवण्यासाठी जर तुम्ही एफडीची मुदत पूर्ण होण्याआधीच एफडी तोडली तर तुम्हाला एक टक्के दंड भरावा लागतो व व फक्त 5.5 टक्क्यांपर्यंतच तुम्हाला व्याज मिळते. हे नुकसान एफडी तोडल्यामुळे होऊ शकते.
एफडीवर कर्ज घेता येईल परंतु फायदा कसा होईल?
समजा एफडी न तोडता तुम्ही कर्ज घ्यायचे ठरवलं तर ते तुम्हाला सामान्य पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त मिळते. एफडीवर तुम्हाला सात टक्क्यांचे व्याज मिळत असेल तर एफडीवर कर्ज तुम्हाला 8.5 ते नऊ टक्के इतक्या व्याजाने मिळते. परंतु यामध्ये तुम्हाला एक ते दीड टक्के व्याज जास्त द्यावे लागते. परंतु तुमची बचत सुरक्षित राहते व एफडीच्या मुदतीपर्यंत ती सुरक्षितपणे चालू राहते. त्यामध्ये फायदा असा होतो की तुमच्यावर कर्जाचा बोजा पडतो. परंतु तुमच्याकडे बचत देखील राहते.
पैशांची गरज उद्भवल्यास हे करा
समजा तुम्हाला पैशांची गरज पडली व तुम्ही जी काही एफडी केली आहे त्या एकूण रकमेच्या 20 ते 30 टक्के रक्कम तुम्हाला आवश्यक आहे तर तुम्ही एफडी तोडू नये. तसेच तुमची एफडी सहा महिने किंवा वर्षभरापेक्षा जास्त कालावधीची झाली असेल तर त्याकडे अजिबात लक्ष देऊ नये.
परंतु तुम्हाला एफडीची 80 ते 90% रक्कम हवी असेल आणि तुम्ही एफडी मॅच्युअर म्हणजेच परिपक्व होणार असेल तर एफडी तोडण्याचा प्रयत्न अजिबात करू नये.नाहीतर विनाकारण मिळणाऱ्या व्याजात एक ते दीड टक्क्यांचे नुकसान होते. अशाप्रसंगी कुठून तरी पैशांची व्यवस्था करावी.
एफडी तोडण्याचे फायदे काय मिळतात?
पण तुम्ही फक्त काही महिन्यांच्या कालावधी करिता एफडी केली असेल तर त्यावर कर्ज घेण्याऐवजी ती तोडणे फायद्याचे ठरते. परंतु खूपच जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला पैशांची गरज असेल तरच एफडी तोडावी. परंतु एफडीच्या एकूण रकमेपैकी तुम्हाला 20 ते तीस टक्के पैशांची गरज असेल तर एफडी तोडण्या ऐवजी त्यावर कर्ज द्यावे. परंतु जेव्हा किमान 70% रकमेची जर तुम्हाला गरज असेल तर मात्र एफडी तोडण्याचा विचार करावा. तेही एफडी सुरू करून काही महिने झाले असतील तरच अशा पद्धतीने निर्णय घ्यावा.