केंद्र सरकारच्या माध्यमातून शेती क्षेत्र तसेच उद्योग व्यवसायांना चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय किंवा शेती क्षेत्र असो यांना आर्थिक मदत देऊन उभारी देण्याचे महत्त्वपूर्ण काम सरकारच्या माध्यमातून केले जाते.
अगदी याच पद्धतीने जर आपण उद्योग व्यवसायांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रक्रिया उद्योगांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. याकरिता प्रक्रिया उद्योगांना चालना मिळावी म्हणून अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने देशातील अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत व या उपक्रमांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून मागच्या वर्षी नाशिक जिल्ह्याला आठ ते दहा कोटी रुपये देण्यात आलेले आहेत व त्यानुसार येत्या वर्षांमध्ये ही योजना नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणीला चालना मिळणार आहे.
काय आहे सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचे स्वरूप?
सरकारच्या आत्मनिर्भर अभियानाच्या माध्यमातून अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये व्होकल फॉर लोकलच्या 2020 मध्ये प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू करण्यात आलेली होती व ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे.
या योजनेसाठी 2020 ते 2025 या कालावधी करिता दहा हजार कोटी रुपयांची तरतूद सरकारकडून करण्यात आलेली असून सरकारची ही सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांसाठीची पहिलीच सरकारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योगांना लाभ दिला जातो.
या योजनेच्या माध्यमातून कशासाठी कर्ज मिळते?
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून 90% पर्यंत कर्ज मिळते. या योजनेच्या अनुदानानुसार प्रकल्पाचा जो खर्च असेल त्याच्या पस्तीस टक्के कर्ज मिळू शकते.
अन्नप्रक्रिया उद्योगाची पतमर्यादा वाढवणे तसेच उत्पादनांची ब्रँडिंग आणि विपणाने बळकट करून संघटित साखळीशी जोडणे, प्रयोगशाळा तसेच साठवणूक, पॅकेजिंग, विपणन व उद्योग वाढीसाठी लाभ या योजनेच्या माध्यमातून दिला जातो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करावा लागतो?
या योजनेची जी काही ऑफिशिअल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो. अर्ज केल्यानंतर जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून छाननी करण्यात येते व जिल्हा स्तरावर असलेल्या शासनाच्या उद्योग विभागात योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येऊ शकतो.
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत या योजनेची स्थिती काय आहे?
प्रक्रिया उद्योगांसाठी नाशिक जिल्ह्यात एका वर्षभरात आठ ते दहा कोटींचे वाटप करण्यात आले असून सन 2023 24 या वर्षाकरिता नाशिक जिल्ह्याकरिता 500 उद्योगांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले होते व त्यापैकी अनेक उद्योगांना या माध्यमातून चालना देण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक बचत गटांना देखील फायदा मिळाला आहे.
कधीपर्यंत करावा लागेल अर्ज?
योजना 2020 ते 2025 या पाच वर्षात राबवली जाणार असून सुरुवातीला एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर या योजनेच्या अंमलबजावणी सुरू करण्यात आलेले होती. या योजनेमुळे नाशिक जिल्ह्यातील आणि उद्योगांना विकास करता येणे साध्य झाले असून अनेकांच्या उद्योगांची व्याप्ती वाढवता आली आहे व त्यामुळे रोजगार देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.