एकेकाळी स्वतःच्या मुलाच्या दुधाला पैसे नसलेला हा व्यक्ती आहे 800 कोटींचा मालक! वाचा प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडिया यांची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज आपली आर्थिक परिस्थिती काय आहे? याला महत्व नसून ही परिस्थिती मधून आपण कसे बाहेर निघून आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू याचा विचार करणे खूप गरजेचे आहे. विचार करण्याला देखील खूप महत्व असते कारण कुठल्याही गोष्टीचे सुरुवात ही विचारापासूनच होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण जेव्हा व्यक्तीच्या मनामध्ये काही विचार येतात तेव्हाच आपण त्या विचारांच्या दिशेने कृती करत असतो हे सर्वश्रुत आहे.

आपली खालावलेली किंवा बिकट आर्थिक किंवा कौटुंबिक परिस्थितीला कवटाळत बसून रडत बसण्यापेक्षा त्या परिस्थितीशी दोन हात करून त्यातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे असते व असे प्रयत्न करणारे व्यक्ती नक्कीच एक दिवस यशश्री खेचून आणतात. अशी अनेक उदाहरणे समाजामध्ये आपण बघितलेली असतील किंवा त्यांच्याबद्दल आपण ऐकलेले असेल.

अशी उदाहरणे आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये दिसून येतात व याला शेअर मार्केट हे क्षेत्र देखील अपवाद नाही. शेअर मार्केटमध्ये देखील असे अनेक गुंतवणूकदार आहेत की त्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती परंतु स्मार्ट पद्धतीने त्यांनी शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवले व व्यवस्थित पद्धतीने नियोजन करून ते आज यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले आहेत. असे अनेक नावे आपल्याला सांगता येतील व त्यातीलच एक प्रसिद्ध नाव म्हणजे विजय केडिया हे होय. त्यांचेच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 विजय केडिया 800 कोटींच्या संपत्तीचे मालक कसे झाले?

जर आपण विजय केडिया यांची संघर्षाची सुरुवात पाहिली तर ती प्रामुख्याने त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सुरू होते. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर विजय केडिया यांना खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक धक्का बसल्याने दहावीत ते नापास झाले. त्यांची अशी अवस्था झाली होती की त्यांच्याकडे वडिलांच्या मृत्यूनंतर उदरनिर्वाहाचे किंवा कमाईचे कुठल्याही प्रकारचे साधन नव्हते व तरी देखील या कालावधीत त्यांनी लग्न केले आणि एका मुलाचे वडील देखील झाले.

एका खोलीच्या घरामध्ये ते राहत होते. परंतु कमाईचे कुठलेही साधन नसल्यामुळे खूप मोठ्या आर्थिक टंचाईला त्यांना सामोरे जावे लागले. एक वेळ अशी आली होती की त्यांच्या लहान रडणाऱ्या मुलासाठी दूध आणण्याकरिता देखील त्यांच्याकडे हवे तेवढे पैसे नव्हते. परंतु या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढत प्रचंड प्रमाणात मेहनत आणि जिद्द असल्यामुळे ते आज कोट्यावधी रुपयांचे मालक झाले आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर खर्च चालवण्याचे देखील कुठलेही साधन त्यांच्याकडे नव्हते.

आईचा सल्ला ऐकून त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण खूप कसेबसे पूर्ण केले व त्यानंतर काहीतरी व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून व्यवसाय सुरू केला व त्यामध्ये देखील ते सपशेल अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी हळूहळू शेअर बाजारामध्ये व्यवहार करायला सुरुवात केली परंतु यामधून जे काही कमाई त्यांना होत होती यामधून घर चालवणे देखील कठीण होते. सुरुवातीला काही व्यवसाय मधून त्यांना पैसे चांगले मिळाले परंतु त्यामध्ये नंतर मोठे नुकसान झाले.

एका प्रसंगी तर त्यांना आईचे दागिने विकण्याची वेळ आली. इतक्या बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये असताना मुलासाठी दूध आणायला देखील पैसे त्यांच्याकडे नव्हते. त्यावेळी दुधाची किंमत 14 रुपये होती व 14 रुपये देखील या व्यक्तीकडे तेव्हा नव्हते यावरून त्यांच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना आपल्याला येते. यावेळी त्यांनी घरात इकडे तिकडे ठेवलेली नाणी गोळा केली व 14 रुपये जमवून मुलाला दूध आणले. अशा या सगळ्या अडचणीच्या कालावधीत त्यांनी 1990 च्या दशकामध्ये कोलकत्ता सोडले आणि मुंबईला आले.

परंतु मुंबईने त्यांना संपूर्ण साथ दिली व 1992 ची प्रसिद्ध बुलरन झाली व यामध्ये अनेक गुंतवणूकदारांनी खूप प्रमाणात पैसा कमावला व यामध्ये विजय केडिया हे देखील होते. त्यांनी यावेळी पंजाब ट्रॅक्टरचे शेअर घेतले होते व त्यांची किंमत 35 हजार रुपये होती. परंतु या शेअरची किंमत पाच पटीने वाढली व ते विकून त्यांनी एसीसी या कंपनीचे शेअर्स घेतले. एका वर्षामध्ये या शेअरच्या किमती देखील दहा पटींनी वाढल्या व त्यांना आयुष्यामध्ये सर्वात मोठे आर्थिक यश मिळाले.

त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही व त्यांनी मुंबईत घर घेतले व कुटुंबाला कलकत्त्यावरून मुंबईत शिफ्ट केले. नंतर केडिया यांनी काही शेअर्स विकले व तीन कंपन्यांचे शेअर्स परत विकत घेतले व नशिबाने एवढी मोठी साथ दिली की या तीनही कंपन्यांचे शेअर्स दहा वर्षांमध्ये शंभर पटीने वाढले व आज त्यांची गणना यशस्वी गुंतवणूकदारामध्ये केली जात आहे.

2009 मध्ये त्यांनी एक दूध कंपनी विकत घेतली आणि त्यांच्या पत्नीला ती गिफ्ट दिली. त्यांच्या लहान मुलाला ते 14 रुपयाचे दूध देऊ शकले नव्हते व त्यामुळे त्यांनी पत्नीला ही भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. आज विजय केडिया हे सुमारे 800 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.

यावरून आपल्याला दिसून येते की शेअर मार्केटमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली आणि व्यवस्थित नियोजन केले तर व्यक्तीला यशस्वी होता येते.