रिझर्व बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात महत्त्वाची बँक असून देशांमध्ये जेवढ्या खाजगी किंवा सहकार क्षेत्रातील बँका, वित्तीय संस्था तसेच नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थ एनबीएफसी आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम आरबीआय करते.
रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या माध्यमातून बँकांसाठी बऱ्याच प्रकारचे नियम आखून दिलेले आहेत व या नियमांच्या आत राहून देशातील सरकारी तसेच खाजगी बँकांपासून तर इतर वित्तीय संस्थांना काम करावे लागते.
जर रिझर्व बँकेचे नियम बँकांनी मोडले तर नियमांचे उल्लंघन म्हणून कायद्यानुसार कारवाई केली जाते. अगदी याच पद्धतीने आता रिझर्व बँक ऑफ इंडिया ने आयडीएफसी फर्स्ट बँकेवर कारवाई केली असून त्यासोबतच एलआयसी हाऊसिंग फायनान्सवर देखील रिझर्व बँकेने कारवाई केली आहे.
त्यामुळे नक्कीच आता आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या ग्राहकांना प्रश्न पडला असेल की या कारवाईचा परिणाम हा ग्राहकांवर होऊ शकतो का? यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
रिझर्व बँकेने आयडीएफसी फर्स्ट बँकेवर केली कारवाई
भारतीय रिझर्व बँकेने आयडीएफसी फर्स्ट बँकेवर कारवाई करत बँकेला तब्बल एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून त्यासोबतच एलआयसी हाऊसिंग फायनान्स या फायनान्स कंपनीला देखील 49 लाख 70 हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँकेने नियम आणि काही बंधनांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण रिझर्व बॅंकेच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
एलआयसी हाऊसिंग फायनान्सवर का झाली कारवाई?
रिझर्व बँकेने याबाबत जी माहिती दिली त्या माहितीनुसार पाहिले तर गैर बँकिंग वित्तीय कंपनी- हाउसिंग फायनान्स कंपनी( रिझर्व बँक) दिशानिर्देश-2021 च्या कायद्यातील काही तरतुदींचे पालन एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीने केले नाही व त्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे.
या नॉन बँकिंग फायनान्स कंपन्याचे रजिस्ट्रेशन रद्द
त्यासोबतच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कुंडल मोटार फायनान्स, नित्या फायनान्स, भाटिया हायर परचेस आणि जीवनज्योत डिपॉझिट्स अँड ऍडव्हान्सेस या मोठ्या बिगर बँकिंग वित्तीय संस्था अर्थात एनबीएफसीचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे आता या वित्तीय संस्थांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करता येणार नाही.
आयडीएफसी फर्स्ट बँकेवरील कारवाईचा ग्राहकांवर होईल का परिणाम?
रिझर्व बँकेने आयडीएफसी फर्स्ट बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला असल्यामुळे त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांना नक्कीच प्रश्न पडला असेल की आता ग्राहकांना देखील आर्थिक फटका बसणार का? मात्र रिझर्व बँक ऑफ इंडियाने जो काही निर्णय घेतला आहे
त्याचा बँकेच्या ग्राहकाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्यामुळे याचा थेट फटका हा बँकेला बसणार आहे. या बँकेच्या ग्राहकांना या निर्णयाचा कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही. बँकेच्या ग्राहकांचे हिताचे रक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून व भविष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ नये म्हणूनच आरबीआयने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.