Saving Tips: 50 हजारापर्यंत पगार आहे तरी पैसा पुरत नाही? बचत अगदी शून्य राहते? फक्त करा ‘या’ छोट्या गोष्टी, होईल पैशांची बचत

तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टी निमितपणे केल्या व त्या पाळल्या तर तुमच्याकडे महिन्याच्या शेवटपर्यंत पैसाही शिल्लक राहील व तुम्ही बचत करून त्या बचतीचे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक देखील करू शकाल.

Ajay Patil
Published:
saving tips

Saving Tips:- आपल्याला किंवा आपल्या मित्रांच्या बाबतीत आपण अनेकदा अनुभव घेतला असेल की पगार ही 50 हजारापासून ते लाख रुपये पर्यंत असते. महिना संपत नाही तोपर्यंत खात्यावर पैसे शिल्लक राहत नाहीत व बऱ्याचदा पैशांसाठी कुणाकडे तरी हात पसरवायची वेळ येते.

कारण बऱ्याच व्यक्तींचा खर्च खूप जास्त प्रमाणात असल्याने पगार बँक खात्यामध्ये जमा होताच आपण नको त्या ठिकाणी खर्च करत सुटतो व बचत किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी महिन्याच्या शेवटी आपल्याकडे पैसा राहत नाही त्यामुळे पूर्ण कुटुंबाला बऱ्याचदा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

परंतु या समस्येवर जर तुम्हाला मात करायची असेल तर तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टी निमितपणे केल्या व त्या पाळल्या तर तुमच्याकडे महिन्याच्या शेवटपर्यंत पैसाही शिल्लक राहील व तुम्ही बचत करून त्या बचतीचे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक देखील करू शकाल.

ही गोष्ट नक्कीच तुमच्या उज्वल आर्थिक भविष्यासाठी फायद्याची ठरते. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशा छोट्या गोष्टी बघणार आहोत ज्या तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करू शकतात व तुमच्याकडे पैसा देखील शिल्लक राहू शकतो.

 पगार खात्यावर जमा होतात अगोदर करा हे काम

1- बचत आणि गुंतवणुकीचे रक्कम साईडला काढा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये पगार जमा होईल तेव्हा सगळ्यात अगोदर बचत आणि गुंतवणुकीची रक्कम वेगळी काढावी व त्यानंतर काय खर्च असेल तो तुम्ही करावा.

ही आधी गोष्ट जर तुम्ही केली नाही तर तुमचा संपूर्ण पगार वाया जाऊ शकतो व त्यानंतर मात्र तुम्हाला बचत किंवा गुंतवणूक करणे शक्य होणारच नाही. त्यामुळे तुमच्या खात्यात पगार येताच सगळ्यात अगोदर प्राधान्य हे बचत आणि गुंतवणुकीला देणे गरजेचे राहील व अशा मुळे तुमचा महिन्याचा जो काही अनावश्यक असा खर्च असेल तो देखील तुम्ही नियंत्रणात ठेवू शकाल.

2- पगार होताच वीस टक्के रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करावी बऱ्याचदा पगार हा महिन्याच्या शेवटच्या तारखेला किंवा महिन्याच्या पहिल्या तारखेला होत असतो. जेव्हा तुमचा पगार होईल तेव्हा ताबडतोब तुम्ही तुमच्या पगारातील 20% रक्कम दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करा आणि पहिल्या आठवड्यातच ती गुंतवा.

पगार होण्याच्या पहिल्या आठवड्यातच गुंतवणूक करायला प्राधान्य द्यावे. बरेच जण महिन्याच्या शेवटच्या तारखेला गुंतवणूक करण्याची एक मोठी चूक करतात. परंतु महिना संपेपर्यंत खर्च इतका मोठ्या प्रमाणात झालेला असतो की आपल्याकडे गुंतवणुकीला पैसा शिल्लक राहत नाही.

त्यामुळे अगदी पहिल्या आठवड्याच्या आत्ताच गुंतवणुकीचे पैसे साईडला काढून ते गुंतवावेत आणि त्यानंतर पगार शिल्लक राहील तो तुम्ही खर्च करू शकतात.

 कोणत्या ठिकाणी गुंतवणूक राहील फायद्याची?

तुम्हाला देखील गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही रिकरिंग डिपॉझिट स्कीम म्हणजेच आवर्ती ठेव, पीपीएफ योजना किंवा एसआयपी, म्युच्युअल फंड इत्यादी योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात.

अशा योजनांमध्ये जर तुम्ही प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम दीर्घ काळापर्यंत गुंतवत गेला तर तुम्ही एक मोठा निधी जमा करू शकतात. या करिता तुमच्या पगारातील फक्त 20 टक्के रक्कम पुरेशी ठरते व ही रक्कम तुम्ही वेगवेगळ्या योजनांमध्ये विभागून गुंतवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe