मुलांकरता दररोज 150 रुपयांचे बचत करा आणि एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीत गुंतवा! मुलांसाठी पैसा तर जमा करालच परंतु मिळेल विम्याचा फायदा

प्रत्येक पालक हे मुलांच्या भविष्याविषयी खूप जागरूक असल्याचे सध्या दिसून येते.मूल जन्माला आल्यानंतरच त्याच्या भविष्यकालीन आर्थिक दृष्टिकोनातून आर्थिक नियोजन करण्यासाठी आताचे पालक पटकन पावले उचलायला सुरुवात करतात.

Ajay Patil
Published:
lic policy

LIC Jeevan Tarun Policy:- प्रत्येक पालक हे मुलांच्या भविष्याविषयी खूप जागरूक असल्याचे सध्या दिसून येते.मूल जन्माला आल्यानंतरच त्याच्या भविष्यकालीन आर्थिक दृष्टिकोनातून आर्थिक नियोजन करण्यासाठी आताचे पालक पटकन पावले उचलायला सुरुवात करतात.

जेणेकरून पुढे चालून मुलांचे उच्च शिक्षण तसेच त्यांचे लग्नकार्य इत्यादी करिता पैशांची कमतरता भासू नये व मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावीत हा पालकांचा प्रमुख उद्देश यामागे असतो. त्यामुळे मुलांच्यासाठी विविध गुंतवणूक योजनांमध्ये पैसा गुंतवला जातो.

तसे पाहायला गेले तर सध्या अनेक गुंतवणूक पर्याय हे उपलब्ध आहेत व प्रत्येक पर्यायाचे वैशिष्ट्ये आणि मिळणारा परतावा हा देखील वेगवेगळा असतो. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार गुंतवणूक पर्यायाची निवड करत असतात. परंतु या सगळ्या पर्यायांचा जर विचार केला तर यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी देखील एक उत्तम पर्याय ठरतो.

आपल्याला माहित आहे की एलआयसीच्या माध्यमातून अनेक पॉलिसीज राबवण्यात येतात व यातून विमा संरक्षणासारख्या महत्त्वाच्या गोष्टीचा फायदा हा मिळत असतो. परंतु मुलांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करण्याकरिता जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर एलआयसीची जीवन तरुण पॉलिसी हा एक गुंतवणुकीसाठीचा उत्तम पर्याय ठरू शकतो.

कसे आहे एलआयसीच्या जिवन तरुण पॉलिसीचे स्वरूप?
एलआयसीची जीवन तरुण पॉलिसी ही पार्टीसिपेटिंग, इंडिव्हिज्युअल, नॉन लिंक्ड आणि लाइफ इन्शुरन्स सेविंग पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये किंवा या प्लानमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर मुलांसाठी तुम्ही बचत तर करू शकतात.

तसेच त्यांना विम्याचा देखील फायदा मिळतो. या पॉलिसीमध्ये जर मुलांसाठी गुंतवणूक करायची असेल तर मुलांचे वय 90 दिवस ते बारा वर्षे यादरम्यान असणे गरजेचे आहे. जोपर्यंत मुलाचे वय वीस वर्षे होत नाही तोपर्यंत तुम्हाला या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करावी लागते व ही पॉलिसी वयाच्या 25 व्या वर्षी मॅच्युअर होते.

150 रुपयांची बचत तुमच्या मुलाला बनवू शकते लखपती
एलआयसीच्या जिवन तरुण पॉलिसीमध्ये तुम्ही दररोज दीडशे रुपयांची बचत करून गुंतवणूक करू शकतात व या माध्यमातून देखील चांगला परतावा मिळवू शकतात. समजा तुमच्या मुलाचे वय बारा वर्षे आहे व या बारा वर्षाच्या मुलाकरिता तुम्ही ही पॉलिसी खरेदी करून गुंतवणूक केली आहे.

यामध्ये प्रत्येक दिवसाला तुम्ही 150 रुपयांची बचत करून या पॉलिसीमध्ये हे पैसे गुंतवत आहात. तर एक वर्षांमध्ये तुम्ही यामध्ये पंचावन्न हजार रुपयांची गुंतवणूक करतात. अशाप्रकारे तुम्हाला तुमचा मुलगी/मुलगा वीस वर्षाचे होईपर्यंत ही गुंतवणूक करावी लागते व तुमच्या मुलाच्या बारा वर्षापासून तर वीस वर्षाच्या होईपर्यंतच्या आठ वर्षाच्या कालावधीमध्ये दरवर्षी 55 हजार याप्रमाणे तुम्ही चार लाख 40 हजार 665 रुपये गुंतवतात.

जीवन तरुण पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला दोन लाख 47 हजार रुपयांचा बोनस मिळतो व त्यासोबत 97 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस देखील मिळतो.जेव्हा मुल पंचवीस वर्षाचे होते तेव्हा जवळपास आठ लाख 44 हजार पाचशे रुपये मिळतात. म्हणजेच तुम्ही एकूण केलेल्या चार लाख 40 हजार 665 रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला जवळपास दुप्पट परतावा मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe