SBI Deposit Scheme:- नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून कष्ट करून व्यक्ती पैसे कमवतो. भविष्यकालीन आर्थिक गरजांच्या दृष्टिकोनातून कमावलेल्या पैशांचे योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे असते. गुंतवणूक करताना केलेली गुंतवणूक सुरक्षित रहावी आणि परतावा चांगला मिळावा या दृष्टिकोनातून गुंतवणुकीचे पर्याय शोधले जातात.
साधारणपणे शेअर मार्केट, म्युचअल फंड तसेच वेगवेगळ्या एसआयपी, अनेक बँकांच्या मुदत ठेव योजना यामध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. जरा बँकांमध्ये विचार केला तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही आघाडीची बँक असून या बँकेच्या देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजना आहेत.
त्यातीलच एक योजना म्हणजे एसबीआय एन्यूटी डिपॉझिट स्कीम होय. या फायदेशीर गुंतवणूक योजना असून यामध्ये तुम्हाला एका वेळी एकरकमी गुंतवणूक करणे गरजेचे असते. याच योजनेविषयीचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.
एसबीआयची फायदेशीर गुंतवणूक स्कीम
स्टेट बँक ऑफ इंडियाची एन्यूटी डिपॉझिट स्कीम ही एक फायदेशीर गुंतवणूक योजना असून यामध्ये एकावेळी एकरकमी रक्कम गुंतवणूक करणे गरजेचे असते. गुंतवणूक केल्यानंतर या रकमेवर तुम्हाला मूळ रकमेचा एक भाग आणि घटत्या मूळ रकमेवर व्याज मिळते. या योजनेमध्ये तुम्ही 120 महिन्यांकरिता गुंतवणूक करू शकता.
यामध्ये कमीत कमी महिन्याला एक हजार रुपये एनयूटी आहे. तुम्ही जास्तीत जास्त कितीही रक्कम ठेव म्हणून ठेवू शकतात व यावर कुठलीही मर्यादा नाही. गुंतवणूकदाराला किंवा ठेवीदाराला काही प्रकरणांमध्ये एकूण एन्यूटी शिल्लक पैकी 75% पर्यंत किंवा कर्ज घेण्याची सुविधा देखील या माध्यमातून मिळते. समजा दुर्दैवाने ठेविदाराचा मृत्यू झाला तर मुदत पूर्ण होण्याआधीच पेमेंट केले जाऊ शकते व यावर कुठलीही मर्यादा नसते.
ठेवीवर इतके मिळते व्याज
या योजनेच्या माध्यमातून मिळणारा व्याजदर हा ज्येष्ठ नागरिकांना व सार्वजनिक मुदत ठेवींवर मिळणाऱ्या मुदत ठेवी इतकाच मिळतो. महत्वाचे म्हणजे स्टेट बँकेने काही दिवसांपूर्वीच मुदत ठेवींवर असलेल्या व्याजदरात वाढ केलेली आहे. यानुसार जेष्ठ नागरिकांना 6.9% आणि सामान्य गुंतवणूकदारांना 6.1% इतके व्याज मिळते. महत्त्वाचे म्हणजे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला चार मुदतीमध्ये ठेव ठेवता येते व वेगवेगळ्या कालावधी करिता तुम्हाला वेगवेगळ्या व्याजाचा फायदा मिळतो.
काय असते एन्यूटी योजना?
एन्यूटी योजना ही फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव योजनेपेक्षा जरा वेगळी असते. ठेविदाराला मुदत ठेव म्हणजेच एफडी खात्यामध्ये एकदा पैसे जमा करावे लागतात आणि मुदत पूर्ण झाल्यानंतर मुद्दल आणि व्याजाचा लाभ मिळतो. टीडीआर च्या बाबतीत मुदत पूर्ण झाल्यानंतर फक्त मूळ रक्कम मिळते व विशिष्ट अंतराने व्याज मिळत राहते.
परंतु एन्यूटी डिपॉझिट मध्ये तुम्हाला एकाच वेळी रक्कम जमा करावी लागते आणि तुम्ही ठरवलेल्या कालावधीमध्ये बँक तुम्हाला त्याची परतफेड करते. यामध्ये तुम्ही ठेवलेली मूळ रक्कम आणि व्याजाचा काही भागाचा समावेश असतो. म्हणजे सोप्या भाषेत समजून घेतले तर तुमच्या एक वेळ केलेल्या पेमेंट वर बँक तुम्हाला प्रत्येक महिन्याला ईएमआय देते. यामध्ये तुम्हाला मूळ रकमेचा आणि व्याजाचा काही भाग मिळत असतो. यामध्ये तुमची मूळ रक्कम कमी कमी होत जाते व मुदत पूर्ण होईपर्यंत तुम्ही ठेवलेली रक्कम ही शून्य होते.
अशा पद्धतीने तुम्ही एक रकमी ठेवलेल्या ठेवीवर तुम्हाला महिन्याला आर्थिक लाभ मिळत असतो.