SBI Loan Rule: स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जासंदर्भातील नियमांमध्ये केला मोठा बदल! थेट होणार बँकेच्या ग्राहकांवर परिणाम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Loan Rule:- भारतीय स्टेट बँक हे भारतातील सर्वात मोठी व सर्वात जुनी बँक असून या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. साधारणपणे 1955 मध्ये भारत सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकांच्या यादीत स्टेट बँक ही जगातील 43 क्रमांकावर असलेली सर्वात मोठी बँक आहे.

या बँकेच्या भारतामध्ये 22,405 शाखा असून संपूर्ण जगभरामध्ये ही बँक काम करते. तसेच या बँकेच्या ग्राहकांची संख्या देखील मोठी आहे. भारतामध्ये या बँकेचे 57 प्रादेशिक कार्यालय आणि 16 प्रादेशिक केंद्र आहेत. त्यामुळे साहजिकच या बँकेचे ग्राहकांची संख्या मोठी असल्यामुळे बँकेने घेतलेल्या निर्णयांचा प्रत्यक्ष परिणाम हा फार मोठ्या संख्येने ग्राहकांवर होत असतो.

याच अनुषंगाने देशातील सर्वात मोठी असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट अर्थात एमसीएलआर मध्ये बदल केले असून त्याचा थेट परिणाम हा बँकेच्या ग्राहकांवर होणार आहे.

 एसबीआयच्या या निर्णयाचा थेट होणार बँकेच्या ग्राहकांवर परिणाम

सविस्तर वृत्त असे की, स्टेट बँक ऑफ इंडिया ने एमसीएलआर मध्ये काही बदल केला असून यामध्ये ओव्हर नाईट, एक, तीन आणि सहा महिन्याच्या एमसीएलआर वाढवला असून तो अनुक्रमे आठ टक्के, 8.15% आणि 8.45% करण्यात आला आहे. तसेच एक वर्षाचा एमसीएलआर हा आता 8.55% आहे. त्याप्रमाणेच दोन वर्षाचा एमसीएलआर 8.65 तर तीन वर्षाचा 8.75 टक्के एवढा आहे.

 कालावधीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया चा एमसीएलआर

1- ओव्हरनाईट एमसीएलआर आठ टक्के

2- एक महिना एमसीएलआर 8.15%

3- तीन महिने एमसीएलआर 8.15%

4- सहा महिने एमसीएलआर 8.45%

5- एक वर्ष एमसीएलआर 8.55%

6- दोन वर्ष एमसीएलआर 8.65%

7- तीन वर्ष एमसीएलआर 8.75%

 एमसीएलआर म्हणजे काय?

बँक ग्राहकांना कर्ज देतात व ते कर्ज देताना ज्या दराने कर्ज दिले जाते किंवा बँक ग्राहकांना कर्ज देऊ शकते हाच तो किमान दर असतो.बेंच मार्क हा एक वर्षाचा एमसीएलआर वाहन तसेच वैयक्तिक व गृह कर्ज यासारख्या कर्जावरील व्याजदर निर्धारित करण्यासाठी वापरला जातो.