SBI Loan:- सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र सरकारने अनेक योजनांची आखणी केली असून त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांशिवाय पर्याय नसल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सौर ऊर्जाचा वापर करता यावा या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
नुकतीच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम सूर्य घर योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून जवळपास एक कोटी कुटुंबांच्या घराच्या छतावर सोलर सिस्टम बसविण्यात येणार असून या माध्यमातून 300 युनिट मोफत विजेचा फायदा मिळणार आहे.
तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पुरेशी जागा असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात व सोलर पॅनल बसवून पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानाचा फायदा देखील मिळवता येणार आहे.
परंतु जरी या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल किंवा सोलर सिस्टम बसवण्यासाठी अनुदान मिळत असले परंतु अगोदर करावा लागणारा खर्च हा खूप जास्त असल्यामुळे प्रत्येकालाच ते शक्य होईल असे नाही. परंतु आता याकरिता तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया कडून कर्ज मिळणे शक्य होणार आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेऊ.
एसबीआय कडून कर्ज घ्या आणि सोलर रूफटॉप बसवा
केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून सोलर सिस्टम बसवण्यासाठी अनुदान मिळणार आहे व ह्या अनुदान किमान 30000 ते कमळ 78 हजार रुपये पर्यंत असणार आहे. परंतु अशाप्रकारे सोलर रूफ टॉप बसवण्याकरिता मात्र येणारा खर्च हा किलोवॅट नुसार असल्यामुळे लाखो रुपयात येतो.
त्याकरता अगोदर खिशातून पैसे टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे अशाप्रकारे सोलर सिस्टम किंवा सोलर रूफ टॉप बसवणे बऱ्याच जणांना अशक्य होऊ शकते. परंतु आता काळजी करण्याची गरज नसून याकरिता तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कर्ज मिळणे शक्य होणार आहे.
जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुमच्याकडे घराच्या छतावर सोलर रूफ टॉप बसवण्याकरिता पैसे नसतील तर एसबीआय तुम्हाला कर्ज देणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने या योजनेअंतर्गत कर्ज योजना सुरू केली असून याअंतर्गत तुम्हाला सोलर पॅनल बसवण्याकरिता कर्ज मिळणार आहे.
हे कर्ज कोणाला मिळू शकते?
समजा तुम्हाला जर तीन किलोवॅट क्षमतेचे सोलर रूफ टॉप बसवण्याकरिता उत्पन्नाचे कोणत्याही प्रकारचे निकष नाहीत. परंतु तीन किलोवॅट पेक्षा जास्त आणि दहा किलो वॅट पर्यंतच्या क्षमतेकरिता कर्ज घ्यायचे असेल तर अर्जदाराचे निव्वळ वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
या योजनेतून किती मिळेल कर्ज व काय राहील व्याजदर?
तुम्हाला जर तीन किलो वॅट क्षमतेचे सोलर रूफ टॉप बसवण्याकरिता तुम्हाला दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणे शक्य आहे व त्याचा व्याज दर हा वार्षिक 7% इतका आहे. तीन किलोवॅट पेक्षा जास्त आणि दहा किलोवॅट पर्यंतच्या क्षमतेसाठी तुम्हाला सहा लाख रुपये पर्यंत कर्ज या माध्यमातून मिळू शकणार आहे
व याकरिता वार्षिक व्याजदर 10.15 टक्के असणार आहे. साठ ते सत्तर वर्ष वयोगटातील व्यक्तींना देखील या माध्यमातून कर्ज मिळणे शक्य आहे. विशेष म्हणजे या कर्जासाठी बँकेकडून कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.