SBI Special FD Scheme: एसबीआयच्या ‘या’ मुदत ठेव योजनेत कराल गुंतवणूक तर कमवाल लाखोत! या तारखेपर्यंत घ्या फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Special FD Scheme:- गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार ज्या विविध पर्यायांचा विचार करतात व या पर्यायांमधून गुंतवणुकीतून मिळणारा परतावा चांगला ज्या ठिकाणाहून मिळेल व आपली केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील अशा दृष्टिकोनातून गुंतवणूक पर्याय निवडत असतात.

यामध्ये जर आपण विचार केला तर विविध बँकांच्या मुदत ठेव योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना आणि सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांची निवड या माध्यमातून केली जाते. सगळ्यात जास्त प्रमाणात गुंतवणुकीसाठी बऱ्याच व्यक्ती बँकेच्या मुदत ठेव योजनांची निवड करतात.

या अनुषंगाने जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘एसबीआय अमृत कलश स्पेशल एफडी’ या योजनेचा विचार केला तर ही गुंतवणुकीसाठी अतिशय फायद्याची अशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे परतावा मिळवून लाखो रुपये मिळवू शकतात.

 कसे आहे एसबीआय अमृत कलश स्पेशल एफडी योजनेचे स्वरूप?

स्टेट बँक ऑफ इंडियाची ही वैशिष्ट्यपूर्ण आणि खास योजना असून या योजनेमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित असते व तुम्हाला कमवायचा एक चांगला मार्ग देखील सापडतो.

या योजनेची अंतिम तारीख अनेक वेळा बँकेच्या माध्यमातून वाढवण्यात आली आहे आणि यावेळी या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची मुदत  म्हणजेच अंतिम तारीख 31 मार्च 2024 ही आहे. यानंतर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही.

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या एफडी योजनेचे स्वरूप पाहिले तर या योजनेत सामान्य एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा दरम्यान ही एफडी योजना लॉन्च करण्यात आली होती.

 किती दिवसांसाठी करावी लागते गुंतवणूक?

एसबीआयच्या अमृत कलश एफडी  योजनेमध्ये कमीत कमी चारशे दिवस गुंतवणूक करावी लागते. यामध्ये सामान्य नागरिकांना 7.10% दराने व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50% जास्तीचे व्याज मिळते. म्हणजेच 7.60% व्याज ज्येष्ठ नागरिकांना मिळते.

हा व्याजदर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नियमित एफडी वरील व्याजापेक्षा जास्त आहे. समजा या योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी चारशे दिवस गुंतवणूक करावी लागते व तुम्ही तुमची एफडी चारशे दिवसांपूर्वीच मोडली किंवा खंडित केली तर ठेवीच्या वेळी लागू होणारा व्याजदर कमी होईल.

ही वजावट 0.50% ते 1% पर्यंत असू शकते. अमृत कलश स्पेशल एफडी वरील व्याजाचे पेमेंट मासिक, त्रिमासिक किंवा अर्धवार्षिक म्हणजे सहामाही आधारावर केले जाते आणि ते तुमच्या खात्यात जमा केले जाते.