SBI Special Scheme : SBI ची पैसे डबल करणारी विशेष योजना, बघा कोणती?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Special Scheme : बँका नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणत असतात, अशातच स्टेट बँक ऑफ इंडिया देखील वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी अशा विशेष योजना ऑफर करते, ज्याअंतर्गत ग्राहक चांगला परतावा मिळवू शकतील. आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अशाच एका योजनेबद्दल बोलणार आहोत, जी सध्या सर्वत्र लोकप्रिय होत आहे.

स्टेट बँक अशी एक योजना चालवत आहे. यामध्ये गुंतवणूक केल्याने ग्राहकांचे पैसे दुप्पट होतील. स्टेट बँक इंडियाची ही योजना मुदत ठेव योजना आहे. बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी. पण तरीही एफडी ही अनेकांची पहिली पसंती असते. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुकर्षित गुंतवणूक मानली जाते.

दरम्यान, जर तुम्ही अशा गुंतवणुकीच्या शोधात असाल, ज्यामध्ये निश्चित वेळेनंतर पैसे दुप्पट होतात (स्टेट बँक ऑफ इंडिया स्पेशल एफडी योजना) आणि सुरक्षित देखील असतील, तर SBI ची ही योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.

SBI आपल्या ग्राहकांना FD च्या वेगवेगळ्या कालावधीचे अनेक पर्याय ऑफर करते. ज्यामध्ये सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या एफडीचा समावेश आहे. बँक 3 टक्के ते 6.5 टक्के व्याजदरासह FD सुविधा देखील देत आहे. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ३.५ ते ७.५ टक्के व्याज दिले जात आहे.

पैसे दुप्पट कसे होणार?

जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दहा वर्षांसाठी 1 लाख रुपयांची एफडी केली, तर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला जमा केलेल्या रकमेच्या दुप्पट परतावा मिळेल. या गुंतवणुकीवर ६.५ टक्के दराने व्याज दिले जाते. गुंतवणूकदारांना दहा वर्षांत अंदाजे 10 लाख रुपये मिळतील.

या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना दहा वर्षांसाठी ७.५ टक्के व्याज दिले जाते. म्हणजे एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने दहा वर्षांसाठी 1 लाख रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटीवर 2,10,234 रुपयांचा नफा मिळेल. या रकमेत 1,10,234 व्याज उत्पन्नाचा समावेश आहे.