Scheme For Student: सरकार विद्यार्थ्यांना देत आहे 51 हजार रुपये! वाचा कोणती आहे योजना?

Published on -

Scheme For Student:- केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या आर्थिक प्रगती करिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यामध्ये व्यवसाय उभारणीसाठी कर्ज सुविधा देखील अनेक योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते.

अगदी त्याच पद्धतीने शिक्षणाच्या बाबतीत देखील सरकारच्या योजना असून पैशांच्या कमतरतेमुळे किंवा आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता या योजनांच्या माध्यमातून खूप मोठा फायदा विद्यार्थ्यांना होतो.

राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती योजना देखील राबवल्या जातात. एवढेच नाही तर काही योजनांच्या माध्यमातून विदेशात शिक्षणाची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळते. अशा योजनांपैकी एक योजना म्हणजे स्वाधर योजना होय.

या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून मदत व्हावी याकरिता 51 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. आर्थिक व दुर्बल घटकातील म्हणजेच गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्वाधर योजनेचा लाभ मिळतो.

 स्वाधर योजनेचे स्वरूप कसे आहे?

ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली असून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा लाभ मिळावा या व्यापक उद्दिष्टाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी शहरामध्ये शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत कॉलेज तसेच विद्यापीठाच्या माध्यमातून होस्टेलची सुविधा देखील मिळते.

आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. त्यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार असून विद्यार्थी कमीत कमी दहावी उत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत या माध्यमातून मिळणार आहे. महाराष्ट्र सरकार स्वाधार योजनेच्या अंतर्गत 51 हजार रुपयांची आर्थिक मदत विद्यार्थ्यांना करते.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता

1- ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

2- दहावी आणि बारावीनंतर प्रवेश घेतलेला जो काही अभ्यासक्रम असेल तो दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीचा नसावा.

3- तसेच या विद्यार्थ्यांना 60% गुण असणे गरजेचे आहे व दिव्यांग विद्यार्थ्या असेल तर त्यांना 40 टक्के गुण असावेत.

4- तसेच सदर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे व त्याचे स्वतःचे बँकेत खाते असावे.

त्यामुळे या योजनेचे अधिक माहिती घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!