Share Market Investment: मोदींची लोकसभेत हॅट्रिकची शक्यता! त्यामुळे ‘या’ कंपन्यांच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांना मिळेल तुफान परतावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market Investment:- शेअर मार्केटमध्ये बरेच जण गुंतवणूक करत असतात. शेअर मार्केटच्या व्यवहारामध्ये काय मच चढ-उतार होत असते हे आपल्याला माहित आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडींचा परिणाम हा शेअर बाजारावर होत असतो. या घडामोडींच्या अनुषंगाने कधी कधी शेअर बाजार प्रचंड प्रमाणात घसरतो तर कधीकधी खूप मोठ्या प्रमाणावर उच्चांकी पातळी गाठतो.

या घडामोडीमध्ये राजकीय तसेच सामाजिक, आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही महत्त्वाच्या घडामोडींचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. जर राजकीय दृष्टिकोनातून विचार केला तर राजकीय परिस्थितीचा देखील खूप मोठा परिणाम हा शेअर बाजारावर होतो. सध्या देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला व प्रमुख तीन राज्यांमध्ये भाजपने काँग्रेसचा धुवा उडवला.

या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांना लोकसभेची सेमी फायनल म्हणून पाहिले जात होते. या निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारल्यामुळे येणाऱ्या लोकसभेत देखील भाजपचे सरकार येईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. 3 डिसेंबरला जेव्हा या राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला तेव्हा शेअर बाजारांमध्ये प्रचंड तेजी दिसून आली. सेन्सेक्स ने 68,500 तर निफ्टीने 20550 अंकांची पातळी ओलांडली.

या निकालामुळे पुन्हा देशावर मोदी राज येईल असे शक्यता निर्माण झाली आहे व त्यामुळे देखील शेअर बाजारामध्ये तेजीची स्थिती आहे. जर आपण याबाबतीत तज्ञांचा विचार केला तर त्यांच्या मते शेअर बाजार प्री इलेक्शन मोडमध्ये असून यापूर्वीचा इतिहास पाहिला तर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पाच ते सहा महिने अगोदर शेअर बाजारामध्ये दहा ते 35 टक्क्यांची वाढ झाल्याचे बऱ्याचदा दिसून आलेले आहे

व साधारणपणे 1999 च्या लोकसभेच्या निवडणुकीपासून त्याचा परिणाम बाजारावर दिसून येतो. त्यामुळे आता या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तज्ञांचे काही महत्त्वाच्या शेअर्सवर लक्ष असून ते कोणते शेअर्स आहेत की जे चांगला परतावा देऊ शकतात.

 या शेअर्सवर आहे बाजारातील तज्ञांचे लक्ष

यामध्ये जर पाहिले तर स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, महिंद्रा, नाइकी, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, गोदरेज, सनटेक, टायटन, आयएचसीएल, लेमन ट्री हॉटेल, पीएनबी गृहनिर्माण, मेदांता आणि एंजल वन या कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते.

 तज्ञांच्या मते डिसेंबर 2023 मध्ये काय राहील बाजाराची स्थिती?

यामध्ये तज्ञांचे मत आहे की या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला जो काही मोठा विजय मिळाला त्याचा देखील एक मोठा जल्लोष शेअर बाजारपेठेत असून मे 2024 मध्ये येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर नोव्हेंबर पासूनच बाजारपेठेमध्ये निवडणूक पूर्व परिणाम दिसायला लागलेले आहेत.

या निकालानंतर आता परत बाजारपेठेमध्ये सकारात्मक वातावरण तयार होण्याला वेग मिळेल. तसेच जीडीपीचे आकडे देखील मजबूत आल्यानंतर या दोन्ही परिस्थितींचा  परिणाम हा डिसेंबर महिन्यात दिसण्याची शक्यता असून डिसेंबर 2023 मध्ये निफ्टी 21000 च्या पातळीला स्पर्श करेल अशी देखील शक्यता आहे. तसेच सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर या अंकांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे देखील तज्ञांचे मत आहे.