Share Market News: पैसा तयार ठेवा! टाटाचा आयपीओ लवकरच येत आहे बाजारात, वाचा कधी येणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market News:- भारतातील प्रसिद्ध उद्योग समूहांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, मुकेश अंबानी यांचा रिलायन्स उद्योग समूह तसेच टाटा समूह हे खूप प्रसिद्ध असे उद्योग समूह असून भारतीय शेअर बाजारावर या उद्योग समूहांच्या आर्थिक घडामोडीचा खूप मोठा प्रभाव पडत असतो.

शेअर बाजाराच्या संबंधित विचार केला तर अनेक ब्रोकर आणि गुंतवणूकदार  वेगवेगळ्या आणि फायदेशीर अशा आयपीओची वाट पाहत असतात व अशीच प्रतीक्षा बऱ्याच दिवसापासून टाटा समूहाच्या आयपीओ बद्दल होती. त्याच अनुषंगाने आता टाटा समूहातील आयपीओ बद्दल महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आली आहे.

 टाटा समूहाचा आयपीओ लवकरच बाजारात होणार दाखल

याबाबतचे सविस्तर वृत्त असे केले, भारतातील प्रमुख आणि प्रसिद्ध असे उद्योग समूह असलेल्या टाटा समुहाचा आयपीओ जवळपास एकोणावीस वर्षांनी बाजारात येणार असून अनेक जण या आगामी येणाऱ्या आयपीओची वाट पाहत आहेत. याबाबत आपण जर काही मीडिया रिपोर्टचा विचार केला तर त्यांच्यानुसार टाटाच्या आयपीओला सेबीकडून साधारणपणे एक महिन्यापूर्वीच मंजुरी देण्यात आलेली होती.

त्यानुसार आता टाटा समूह लवकरात लवकर 55 हजार कोटी रुपयांचा आयपीओ बाजारामध्ये आणत आहे. यापूर्वी आलेले एलआयसी आणि पेटीएमच्या आयपीओ पेक्षा टाटाचा हा आयपीओ काहीपटीने मोठा आहे. जुलै 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सीचा आयपीओ बाजार मध्ये आला होता. सन 2018 मध्ये आयएलअँडएफएस या बाजारातील मोठ्या गुंतवणूक कंपन्यांना अपयश आले होते व त्यानंतर रिझर्व बँकेने 2021 मध्ये ज्या काही एनबीएफसी आहेत त्या कंपन्यांचे नियम अधिक कठोर केले होते.

टाटाचा विचार केला तर टाटा समूहातील होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्स एक अप्पर लेअर एनबीएफसी असून सप्टेंबर 2022 पर्यंत ही कंपनी सूचीबद्ध करण्याकरिता वेळ देण्यात आला होता व ती वेळ आता वाढवण्यात आली आहे  रिझर्व बँक ऑफ इंडिया ने टाटा सन्सला अप्पर लेयर एनबीएफसी साठी वर्गीकृत केले आहे

व या कंपनीला शेअर बाजारात सप्टेंबर 2022 पर्यंत लिस्टिंग होणे गरजेचे आहे. टाटा सन्स मार्केट व्हॅल्युएशन पाहिले तर ते 11 लाख कोटी रुपये असून जर ही कंपनी शेअर बाजारामध्ये लिस्ट झाली तर  टाटा सन्सचा हा आयपीओ 55 हजार कोटी रुपयांचा होण्याची शक्यता आहे. हा आयपीओ देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरेल.