Share Market Success Story: शेअर बाजारात 5 लाख गुंतवणुकीतून 2200 कोटींची कमाई! वाचा अनिल गोयल यांनी कसे केले शक्य?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market Success Story:- अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. या केलेल्या गुंतवणुकी मधून आपल्याला चांगला परतावा मिळेल ही प्रत्येकाची अपेक्षा असते. या अनुषंगाने जर आपण शेअर बाजारातील गुंतवणुकीचा विचार केला तर अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर करतात.

परंतु प्रत्येकाला शेअर बाजारातून केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा किंवा खूप चांगला पैसा मिळेल असे होताना आपल्याला दिसून येत नाही. यामध्ये बऱ्याच व्यक्तींच्या पोर्टफोलिओमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे देखील आपण पाहतो. यामागे काही स्ट्रॅटेजी चुकतातच परंतु बरेचजण तथाकथित शेअर एक्सपर्टनी दिलेल्या टिप्स वापरतात

व त्या ठिकाणी स्वतःचे नुकसान करून घेतात. परंतु शेअर मार्केटमध्ये असे अनेक व्यक्ती देखील आहेत की त्यांनी खूप कौशल्य आणि हुशारीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली आणि हळूहळू पैसे गुंतवत स्वतःच्या ज्ञानाचा आणि अभ्यासाचा वापर करून खूप पैसा मिळवला.

अगदी याच पद्धतीने जर आपण पाहिले तर अनिल गोयल यांचे उदाहरण आपल्याला सांगता येईल. वयाच्या 41 व्या वर्षी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली व आज पाहता पाहता ते काही हजार कोटी रुपयांचे मालक झाले आहेत. नेमके अनिल गोयल यांनी कुठल्या स्ट्रॅटेजीचा वापर केला किंवा त्यांची पद्धत कशी आहे? याचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 पाच लाख गुंतवणुकीतून 2200 कोटी रुपयांची कमाई

शेअर बाजारामध्ये अनेक नामवंत आणि प्रसिद्ध असे गुंतवणूकदार असून त्यापैकीच एक आहेत अनिल गोयल हे होय. अनिल गोयल यांचे कुटुंब हे स्टील व्यापारी असून ते व्यावसायिक घराण्यातून येतात. त्यांनी साधारणपणे 41 वर्ष वय असताना शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला व पाच लाख रुपये सुरुवातीला गुंतवणूक केली.

आज ते 2200 कोटी रुपये संपत्तीचे मालक आहेत. जर आपण अनिल गोयल यांच्या गुंतवणुकीचे वैशिष्ट्ये पाहिले तर च्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायला मोठमोठे नामवंत गुंतवणूकदार देखील धजत नाहीत त्याच कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यांनी नफा मिळवला. त्यामुळे अनिल गोवयेल यांना शुगर स्टॉक्सचे गुरु मानले जाते.

 काय आहे अनिल गोयल यांचे शेअर बाजारातील गुंतवणुकीचे सूत्र?

अनिल गोयल शेअरच्या किमतीला खूप महत्त्व देतात. त्यांचा विश्वास आहे की कमी किमतीमध्ये जर तुम्ही एखाद्या वस्तूची खरेदी केली तर त्यामध्ये जोखीम नसते. फक्त अशा पद्धतीत तुम्हाला संयम आणि धीर धरणे खूप गरजेचे असते. पैसे गुंतवून तुम्ही संयम राखणे तितकेच महत्त्वाचे आहे व एक दिवस  तुम्ही अशा पद्धतीने या माध्यमातून खूप मोठी कमाई करू शकाल असे ते म्हणतात.

अनिल गोयल स्वतः याच तत्वाने गुंतवणूक करतात. जे शेअर्स नियमित लाभांशासह सातत्यपूर्ण लाभांश वाढ देतात ते शेअर्स खरेदी करायला ते प्राधान्य देतात. तसेच एका क्षेत्रातील अनेक कंपन्यांचा ते तुलनात्मक अभ्यास करतात व त्यानंतर कोणत्या कंपनीत गुंतवणूक करावी हे ठरवतात.

कुठेही पैसे तुम्ही गुंतवणूक करण्या अगोदर स्वतः अभ्यास व संशोधन करणे गरजेचे आहे असे देखील अनिल गोयल म्हणतात. कंपन्यांचे येणारे अहवाल ते काळजीपूर्वक वाचून त्या संबंधित तज्ञांशी चर्चा करूनच गुंतवणुकीच्या बाबतीत निर्णय घेतात. विशेष म्हणजे त्यांना ज्या क्षेत्रातील पूर्ण माहिती आहे त्या क्षेत्रातील शेअर्स मध्येच ते पैसे गुंतवतात.

अनिल गोयल यांची स्टॉक खरेदी करण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते तब्बल  70 ते 80 स्टॉक फॉलो करतात परंतु त्यामधून वीस प्रमुख स्टॉक खरेदी करतात व प्रचंड नफा मिळवतात.तसेच गोयल यांचे मत आहे की कुठलीही संशोधन न करता हाईप किंवा एखाद्या टिपवर गुंतवणूक करू नये.

कमीत कमी किमतीत शेअर्स खरेदी करून दरवेळी जास्त भावात शेअर विकता येत नाहीत. याकरिता दीर्घ कालावधी करिता पैसे गुंतवणे एक चांगली रणनीती असून व्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यांकन जाणून घेतल्याशिवाय आघाडीच्या क्षेत्रांमध्ये पैसे गुंतवणे मूर्खपणाचे असल्याचे ते समजतात. यांच्या मते जोपर्यंत तुम्हाला शेअर मार्केटचे संपूर्ण ज्ञान मिळत नाही तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये थोडे थोडेच पैसे गुंतवणे फायद्याचे ठरते.

अशा पद्धतीने अनिल गोयल यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून कोट्यावधी रुपये कमावले आहेत.