Share Market Update: अदानी समूहाचे शेअर्स खरेदी करावी की नाही? काय राहील स्थिती? वाचा तज्ञांचे मत….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

  Share Market Update: भारतातील प्रसिद्ध असलेला उद्योग समूह म्हणजे अदानी उद्योग समूह होय. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी अदानी समूहा पुढे फार मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या व या अडचणी निर्माण करण्याला प्रमुख जबाबदार होती अमेरिकेची शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग ही होय.या कंपनीच्या एका अहवालाने अदानी समूहाचे पाळेमुळे हालवून दिले होती.

या कंपनीने अदानी समूहाच्या विषयी एक अहवाल प्रसिद्ध केला होता व यामध्ये त्यांनी समूहाच्या शेअरची किंमत ही ओव्हरव्हॅल्यू असल्याचा दावा करण्यात आला होता व यामुळे अदानी समूहाच्या  शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळाली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत अदानी समूह परत तीच उर्जीतावस्था प्राप्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर  सध्या भारतीय शेअर बाजारामध्ये अदानी समूहाच्या शेअरची स्थिती काय आहे आणि ते खरेदी करावी की नाही याबद्दलचा तज्ञांचा सल्ला पाहणार आहोत.

 अदानी एंटरप्राईजेस बद्दल काय म्हणतात तज्ञ?

अदानी एंटरप्राइजेस ही समूहाची एक प्रमुख कंपनी असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये या कंपनीचे शेअर्स वधारतील अशी शक्यता काही ब्रोकरेज व्यक्त करत आहेत. जर आपण मंगळवारी मार्केटची स्थिती पाहिली तर या कंपनीचे शेअर्स इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एक टक्के पेक्षा कमी होऊन 2465.30 रुपयांवर व्यवहार करत होते. या स्थितीनुसार जर आपण तज्ञांचा विचार केला तर जैनम ब्रोकिंगचे तांत्रिक संशोधन प्रमुख असलेले किरण जानी यांनी म्हटले की, अदानी इंटरप्राईजेस हा एक चंगळ डाव ठरू शकतो.

अदानी एंटरप्राइजेस चा शेअर्स  जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर किरण जानी यांनी 2490 रुपयांवर खरेदीची शिफारस केली आहे. टारगेट प्राईज हे 2550 रुपये असून त्याचा स्टॉप लॉस 2459 वर ठेवावा असा देखील मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांच्या मते अदानी एंटरप्राइजेस बऱ्याच दिवसांपासून खूप लो श्रेणीमध्ये व्यवहार करताना दिसत होती परंतु सोमवारपासून यामध्ये काहीशी सुधारणा दिसून येत आहे.

 आदानी इंटरप्राईजेसची सध्या काय आहे स्थिती?

सध्या जर आपण अदानी समूहाच्या प्रमुख कंपनी असलेल्या अदानी इंटरप्राईजेस च्या शेअर चा विचार केला तर 52 आठवड्याच्या उच्चांक 4,189.55 रुपयांवरून तब्बल यामध्ये 41 टक्के घसरण पाहायला मिळाली होती. यावर्षी या कंपनीचे शेअर्स वायटीडी मध्ये 35.82% आणि मागच्या एका वर्षात 7.32% इतका खाली घसरला होता.

गेल्या पाच वर्षाचा या स्टॉकने दिलेल्या परतावा पाहिला तर तो ११४४.१६ टक्के इतका असून या कंपनीचे मार्केट कॅम्प 2,80,993.18 कोटी इतकी आहे. सध्या आपण अदानी समाजाच्या इतर शेअर्सची स्थिती पाहिली तर 31 जुलै रोजी या शेअर्समध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली होती व या समूहाच्या ज्या काही दहा लिस्टेड  कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे शेअर्स देखील ग्रीन कलर मध्ये सध्या बंद झाले आहेत व अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये देखील सर्वात जास्त वाढ दिसून आली आहे.