Share Price: ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये झाली 3 वर्षात 1100 टक्क्यांनी वाढ! गुंतवणूकदारांना मिळणार प्रचंड पैसा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Price:- जर आपण गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराचा ट्रेंड पाहिला तर यामध्ये नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत व सतत वाढीचा कल दिसून येत आहे. जर आपण काल म्हणजेच गुरुवारचा विचार केला तर सेन्सेक्स 322 अंकांच्या वाढीसह ७१६७८ च्या पातळीवर उघडला व त्याच वेळी निफ्टीने देखील 88 अंकांची वाढ नोंदवली व निफ्टी 21 हजार 605 च्या पातळीवर उघडला.

जर आपण सुरुवातीच्या व्यवहार पाहिला तर यामध्ये सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 23 घसरत आणि सात वाढताना दिसून आले. त्यामध्ये प्रामुख्याने मेटल आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये अधिक वाढ झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर आज जर आपण बोरोसिल रिन्यूएबल्स या कंपनीच्या शेअरचा विचार केला

तर यांनी गेल्या काही वर्षात तब्बल 333000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा गुंतवणूकदारांना दिला असून या कालावधीत या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 13 पैशांवरून चारशे रुपयांपर्यंत वाढ झाल्याची स्थिती आहे.

जर आपण 28 डिसेंबर 2023 चा विचार केला तर या दिवशी बोरोसिल रिन्यूएबल्सचे शेअर्स 433.65 रुपये बंद झाले होते. तसेच या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवडे यांची उच्च पातळी ही 572.85 इतकी आहे व 52 आठवड्याची नीचांकी पातळी ही 380.05 इतकी आहे.

 सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत या कंपनीच्या शेअर्सची वाटचाल

जर आपण सात नोव्हेंबर 2003 रोजी चा विचार केला तर त्या दिवशी बोरोसिल रिन्यूवेबल्सचे शेअर्स तेरा पैशांवर होते व ते 28 डिसेंबर 2023 रोजी 433.65 बंद झाले. म्हणजेच या संपूर्ण कालावधीत या कंपनीच्या शेअर्सने तब्बल 333475 टक्क्यांचा परतावा गुंतवणूकदारांना दिला.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीच्या शेअर्समध्ये दीर्घ कालावधी करिता गुंतवणूक केली असेल तर ते आता श्रीमंत झाले आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने सात नोव्हेंबर 2003 रोजी बोरोसिल रिन्यूएबल्स शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल व ती गुंतवणूक आत्तापर्यंत कायम ठेवली असेल

तर त्या शेअरचे सध्या प्राईस किंवा व्हॅल्युएशन हे 33.35 कोटी रुपये इतके आहे. गेल्या साडेतीन वर्षाचा विचार केला तर बोरोसिल रिन्यूएबलच्या शेअर्सने खूप उत्कृष्टरित्या असा परतावा दिला आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर 22 मे 2020 रोजी या कंपनीचे शेअर 34.55 होते. तर 28 डिसेंबर 2023 रोजी 433.65 बंद झाले.

म्हणजेच या कालावधीत बोरोसिल रिन्यूएबल्स या कंपनीच्या शेअर्सने तब्बल 1155 टक्क्यांचा परतावा गुंतवणूकदारांना दिला तसेच ऑगस्ट 2018 मध्ये या कंपनीने प्रत्येक शेअर मागे गुंतवणूकदारांना तीन बोनस शेअर्स दिले होते.

 काय काम करते ही कंपनी?

बोरोसिल रिन्यूएबल्स ही कंपनी एक मल्टी बॅनर कंपनी असून ती अक्षय सौर ऊर्जा पॅनल तयार करण्याचे काम करते.