SIP vs FD : एफडी हे सध्या सर्वात लोकप्रिय गुंतवणुकीचे साधन आहे. कारण एफडीमधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मनाली जाते, तसेच येथे हमी परतावा देखील मिळतो. पण एफडीमधून आपण मर्यादित परतावा मिळवू शकतो. म्हणूनच लोकं सध्या म्युच्युअल फंडामध्ये SIP द्वारे गुंतवणूक करण्यास देखील पसंती देत आहेत. हे मार्केट लिंक्ड असल्यामुळे, तुम्हाला त्यात हमी व्याज मिळत नाही, परंतु काही काळापासून येथे उत्तम परतावा मिळत आहे. येथे गुंतवणूक करून गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले आहेत.
अशा परिस्थितीत, खात्रीशीर परताव्याच्या योजनांना प्राधान्य देणारे गुंतवणूकदार अनेकदा गुंतवणुकीसाठी दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय निवडायचा याबद्दल संभ्रमात राहतात. जर तुम्हालाही अशा गोंधळाच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, तर आज आम्ही FD आणि म्युच्युअल फंडाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, जेणेकरून तुमच्यासाठी गुंतवणूक कुठे फायदेशीर ठरेल हे समजून घेता येईल.
व्याजदर
ज्या व्याजदराने तुम्ही तुमची FD मधील रक्कम निश्चित करता, मॅच्युरिटीवर तुम्हाला त्या व्याजदरानुसार लाभ मिळतो. आज, बहुतेक बँका FD वर जास्तीत जास्त ८% व्याज देत आहेत. तर म्युच्युअल फंड बाजाराशी जोडलेले असतात. बाजारातील चढउताराचा परिणाम यावर दिसून येत आहे. पण जर तुम्ही त्यात SIP द्वारे गुंतवणूक केली तर तुम्हाला सरासरी १२ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते, जे FD पेक्षा खूपच चांगले आहे. हे व्याज जास्तही असू शकते.
लवचिकता
लवचिकतेच्या दृष्टीने पाहिले तर म्युच्युअल फंड अधिक चांगले मानले जातात. जेव्हा तुम्हाला निधीची आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही पैसे काढू शकता. तुम्ही सतत हप्ते भरण्यास सक्षम नसल्यास, तुम्ही काही काळ थांबवू शकता. तर FD मध्ये असे होत नाही. एकदा तुम्ही कालावधीसाठी पैसे निश्चित केले की, तुम्ही त्यापूर्वी पैसे काढू शकत नाही. बाहेर काढल्यास दंड भरावा लागेल.
कर लाभ
कराच्या बाबतीतही म्युच्युअल फंड FD पेक्षा चांगला असू शकतो. म्युच्युअल फंडाच्या ELSS योजनेत, तुम्हाला फक्त तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीसाठी कर सूट मिळू शकते, परंतु FD मध्ये कर लाभ मिळवण्यासाठी, तुम्हाला किमान 5 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय म्युच्युअल फंडाचा एक फायदा असा आहे की तुम्ही तो अगदी कमी रकमेनेही सुरू करू शकता. SIP फक्त 500 रुपयांनी सुरू करता येते.