या व्यक्तीकडे आहे जगातील सर्वात जास्त कार कलेक्शन! आहेत 300 फेरारी तर 600 रॉल्स रॉयस कार, वाचा कोण आहे हा व्यक्ती?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जगामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत की त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे ते जगप्रसिद्ध आहेत. तसेच काही अलौकिक कार्याबद्दल बऱ्याच जणांचे नोंद गिनीज बुकात देखील केली जाते. तसेच श्रीमंतीच्या मानाने देखील जगामध्ये अनेक व्यक्ती असून यामध्ये अनेक उद्योजकांची नावे आपल्याला सांगता येतील.

स्टीव्ह जॉब्स पासून तर मार्क झुकेरबर्ग, तसेच भारतामध्ये अदानी, टाटा तसेच मुकेश अंबानी इत्यादी नावे पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतु ही सगळी मंडळी ही उद्योग जगतातील आहे व त्यांच्याकडे देखील अमाप संपत्ती आहे.

परंतु जर जगातील सर्वात मोठ्या अशा कार कलेक्शनच्या बाबतीत जर विचार केला तर यामध्ये कोणी उद्योगपती चे नाव नाही तर चक्क एका देशाच्या सुलतानाचे नाव येते. याबाबतीत असलेल्या रिपोर्टचा विचार केला तर या सुलतानाकडे तब्बल 4000 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या कार आहेत. त्याच व्यक्ती विषयीची माहिती आपण या लेखात घेऊ.

 ब्रूनेईचे सुलतान हसनल बोलकिया यांच्याकडे आहे जगातील सर्वात मोठे कार कलेक्शन

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ब्रूनेई देशाचे सुलतान हसनल बोलकिया यांच्याकडे जगातील सर्वात मोठे कार कलेक्शन असून या कारचे एकूण मूल्य पाच अब्ज डॉलर्स म्हणजेच 4000 कोटींपेक्षा जास्तीचे आहे. एवढेच नाही तर त्यांच्या या  खास अशा कार कलेक्शन मध्ये 7000 पेक्षा जास्त गाड्या असल्याचे देखील सांगण्यात येते.

जर आपण त्यांचे कार कलेक्शन पाहिले तर यामध्ये लेम्बोर्गिनी, पोर्श, मर्सिडीज बेंज, रोल्स रॉयस, बेंटले सारख्या खूप प्रसिद्ध अशा ब्रँडच्या कारचा समावेश आहे. जर आपण याबाबतीत असलेल्या रिपोर्टचा विचार केला तर सुलतानाकडे त्यांच्या मालकीच्या सात हजार आरामदायी कार असून यामध्ये तब्बल 300 फेरारी तर 600 रोल्स रॉयस कार आहेत.

जर आपण त्यांच्या कार कलेक्शनचा आवाका पाहिला तर 1990 च्या दशकामध्ये ज्या काही सर्व रोल्स रॉईस कार विकल्या गेलेल्या होत्या त्यातील तब्बल निम्म्यापेक्षा जास्त गाड्या या हसनल बोलकिया कुटुंबाच्या मालकीच्या होत्या.

 कोण आहेत हसनल बोलकीया?

ब्रूनेही या देशाला युनायटेड किंगडम पासून जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून म्हणजेच 1984 पासून हसनल बोलकीया हे त्या देशाचे सुलतान आणि पंतप्रधान म्हणून काम बघत आहेत. जगाचा विचार केला तर राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यानंतर इतिहासामध्ये सर्वात जास्त काळ राज्य करणारा राजा म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्यांचे पैसे उडवणे किंवा खर्च याचे प्रमाण पाहिले तर त्याच्या विलासी जीवनाकरिता हसनल बोलकिया यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नोंदवले गेले आहे.