फक्त 10 हजाराच्या गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय ! होणार लाखोंची कमाई, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea Marathi : भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. अनेक अर्थतज्ज्ञांनी देशाची अर्थव्यवस्था येत्या काही वर्षांमध्ये जगातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. मात्र असे असले तरी देशातील बेरोजगारीचा दर हा चिंतेचा विषय ठरत आहे.

भारतासारख्या विकसनशील देशात बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत असल्याने ही देशासाठी चिंतेची बाब आहे. अनेक अर्थतज्ज्ञांनी यावर चिंता देखील व्यक्त केली आहे. बेरोजगारीची समस्या ही खेडे असो किंवा शहर सर्वत्र सारखीच पाहायला मिळत आहे. उच्च शिक्षणानंतरही अनेकांना जॉब लागत नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.

दरम्यान बेरोजगारीची हीच समस्या पाहता आता अनेक तरुणांनी आणि तरुणींनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. स्वतःचा छोटासा स्टार्टअप सुरू करून अनेक तरुणांनी नोकरदाराला लाजवेल अशी कमाई करून दाखवली आहे. जर तुम्हीही बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त असाल किंवा नोकरीच्या कमाईतून तुमचा घर गाडा भागत नसेल आणि तुम्हाला स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे.

कारण की आज आपण एका लो इन्वेस्टमेंट बिजनेस आयडिया बाबत जाणून घेणार आहोत. आजची ही बिजनेस आयडिया महिलांसाठी विशेष खास राहणार आहे. फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील हा बिजनेस यशस्वीरित्या चालू शकणार आहेत. या व्यवसायासाठी सुरुवातीला फक्त दहा हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे.

कोणता आहे तो व्यवसाय ?

आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो व्यवसाय आहे केटरिंगचा. जर तुम्हाला चमचमीत खाद्यपदार्थ बनवता येत असतील तर हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही चमचमीत खाद्यपदार्थ बनवून लोकांना खाऊ घालत असाल तर या व्यवसायातून तुम्ही तुमचे पॅशन तर जोपासणारच आहात शिवाय तुम्हाला अतिरिक्त कमाई देखील होणार आहे.

केटरिंगच्या व्यवसायासाठी फारशी गुंतवणूक देखील करावी लागत नाही. या व्यवसायासाठी तुम्हाला स्वयंपाक बनवण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या वस्तू मात्र खरेदी करावे लागणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरातीलच वस्तू यासाठी वापरू शकता. नंतर जेव्हा तुमचा व्यवसाय मोठा होईल तेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करू शकता.

काय-काय साहित्य लागणार ?

या व्यवसायासाठी तुम्हाला गॅस सिलेंडर, भाजी बनवण्यासाठी कढई, पळी, बादली, इत्यादी स्वयंपाकाची भांडी लागणार आहेत. जर तुम्ही सुरुवातीला घरातील भांडी वापरलीत तर तुमचा पैसा वाचणार आहे. या व्यवसायासाठी मात्र तुम्हाला सुरुवातीलाच काही लेबर लागणार आहे.

जेवण वाढण्यासाठी तसेच जेवण तयार करण्यासाठी देखील तुम्हाला लेबर लागणार आहे. तुम्हाला सर्वच मेन्यू बनवता येत नसतील तर तुम्हाला एक आचारी देखील कामावर ठेवावा लागणार आहे.

ऑर्डर कशा मिळवणार ?

अलीकडे छोटा मोठा फंक्शन, बर्थडे, एनिवर्सरी, लग्न इत्यादी कार्यक्रमांसाठी केटरिंगला ऑर्डर मिळते. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या नवीन व्यवसायासाठी जर ऑर्डर मिळवायचे असेल तर यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने मार्केटिंग करावी लागणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे पॅम्प्लेट आणि विजिटिंग कार्ड बनवून आजूबाजूच्या परिसरात वितरित करू शकता.

मंगल कार्यालय, लॉन्स यांसारख्या ठिकाणाला भेट देऊन त्यांना तुमच्या व्यवसायाबाबत माहिती देऊ शकता. काही मंगल कार्यालय हे केटरिंगसह ऑर्डर स्वीकारतात यामुळे तुम्ही एखाद्या मंगल कार्यालय सोबत भागीदारी करूनही तुमच्या व्यवसायाची सुरुवात करू शकणार आहात.

या व्यवसायात तुम्हाला चांगला मार्जिनही मिळतो. विशेषतः लग्नसराईच्या सीजनमध्ये केटरिंगच्या व्यवसायाला मोठी मागणी असते यामुळे या काळात तुम्हाला अधिकची कमाई होण्याची शक्यता आहे.