Success Story: 10 हजारात सुरू केलीली कंपनी आज आहे 500 कोटींची! वाचा या उद्योजकाची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story:- जीवनाच्या  कुठल्याही क्षेत्रामध्ये यशानंतर अपयश आणि अपयशानंतर यश हे येत असते. परंतु या दरम्यानच्या कालावधीमध्ये खचून न जाता संघर्ष करत राहणे उत्तम काहीतरी आपल्या हातून घडेल यासाठी प्रयत्नशील असणे खूप गरजेचे असते. भारतातीलच नव्हे तर जगातील यशस्वी लोकांची यशोगाथा पाहिली तर यामध्ये कुणाला अपयश आले नाही असे झालेले नाही. प्रत्येक व्यक्तीला अपयश आलेले आहे.

परंतु या अपयशामध्ये खचून न जाता मोठ्या उमेदीने नवीन सुरुवात करत यश मिळवलेले आहे.जीवन म्हणजेच यश आणि अपयशांचा एक खेळ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु अपयश आल्यानंतर मनातील जिद्द कायम ठेवणे खूप गरजेचे असते व आपल्याला जे काही मिळवायचे आहे ते प्रचंड मेहनतीने मिळवण्याची तयारी असेल तर यश मिळतच.

याच अनुषंगाने जर आपण विकास नाहर यांच्या आजवरचा प्रवास पाहिला तर त्यांचा देखील प्रवास असाच अपयशांच्या खाच खडग्यांनी भरलेला आहे. 2016 मध्ये दहा हजार रुपये टाकून सुरू केलेली कंपनी आज पाचशे कोटींची झालेली आहे. त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 दहा हजार ते पाचशे कोटी पर्यंतचा विकास नाहर यांचा थक्क करणारा प्रवास

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शार्क टॅंक इंडिया सीजन दोन मध्ये झळकणारे विकास नाहर हे ड्रायफ्रूट्स अँड स्नेक ब्रँड हॅपीलो या कंपनीचे मालक असून आज ते पाचशे कोटीच्या कंपनीचे मालक आहेत. याबाबत त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा उद्योजक बनण्याचा प्रवासाबद्दल माहिती दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की सातत्याने अपयश येत असताना देखील खंबीरपणे आलेल्या आव्हान व समस्यांना तोंड देत त्यांनी आज पाचशे कोटी रुपयांची कंपनी उभी केलेली आहे.

2016 मध्ये अवघ्या दहा हजार रुपये भांडवल टाकून त्यांनी हॅपीलो कंपनीचे सुरुवात केली. या अगोदर ते सात्विक स्पेशालिटी फुड्स मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत होते. याच कामाच्या दरम्यान त्यांना जो काही अनुभव आला त्या अनुभवांच्या बळावर त्यांनी हॅपीलो या कंपनीची सुरुवात केली.

त्यांचे शिक्षण हे बीसीए झालेले असून ते बेंगलोर युनिव्हर्सिटी मधून त्यांनी पूर्ण केलेले आहे. बीसीए कम्प्लीट केल्यानंतर त्यांनी काही कालावधी करिता जैन ग्रुप सोबत देखील काम केले. परंतु मध्येच त्यांनी एमबीए करण्याचे ठरवले व नोकरी सोडली. एमबीए करण्याकरिता त्यांनी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मधून प्रवेश घेत एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.

या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांना अनेक प्रकारचे अनुभव आले व त्या अनुभवातूनच हॅपीलो कंपनीची स्थापना झाली. विशेष म्हणजे त्यांना पाचशे कोटीची ही कंपनी उभी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट व संघर्ष देखील करावा लागला आहे. त्यामध्ये त्यांना बऱ्याच वेळा अपयश आले परंतु यामध्ये खचून न जाता वारंवार प्रयत्न करणे यशाची गुरुकिल्ली आहे असं त्यांनी मानून प्रयत्न सुरू ठेवले व 500 कोटींची कंपनी आज उभी केली.

विशेष म्हणजे आयुष्यात त्यांना एक नाही तर तब्बल वीस वेळा अपयश आले आणि तरी देखील त्यांनी स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले व संकटांचा सामना करत आज यशाचा पल्ला गाठला.

यावरून आपल्याला समजून येते की कुठलेही यश मिळवण्यासाठी संघर्ष आणि कष्ट लागतातच. परंतु अपयश आल्यानंतर खचून न जाता मोठ्या धिराने प्रयत्न करणे खूप गरजेचे असते.