Success Story: प्रति किलो 1000 किंमत आहे या फळाची! या शेतकऱ्याने एका एकरात एका वर्षात कमावले 60 लाख, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story :- सध्या गहू, हरभरा, भात, ज्वारी तसेच बाजरी  यासारखी परंपरागत पिके आता खूप कमी प्रमाणात लागवड केली जातात व त्यांच्या जागी आता आधुनिक तंत्रज्ञान आणि लागवड पद्धतीचा वापर करत अनेक प्रकारचे फळबागा तसेच विदेशी भाजीपाला यांची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत आहेत. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे  यासारख्या पिकांची लागवड यशस्वी होण्याकरिता योग्य प्रमाणे व्यवस्थापन आणि नियोजन करणे देखील तितकेच गरजेचे असते.

तसेच संरक्षित शेती ही पद्धत आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर वापरू लागले असल्याने शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाने कुठल्याही हंगामात कुठलेही पीक घेणे आता शक्य झाले आहे. याचेच उत्तम उदाहरण जर आपल्याला घ्यायचे राहिले तर सफरचंद हे फळपीक प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये चांगले येणारे पीक आहे.

महाराष्ट्राच्या वातावरणात देखील शेतकऱ्यांनी सफरचंद यशस्वी करून दाखवले आहे. अगदी त्याच पद्धतीने ब्लूबेरी फार्मिंगचा विचार केला तर यामध्ये अमेरिकन ब्लूबेरीला बाजारपेठेत खूप चांगली मागणी असते व त्यामुळे महाराष्ट्रात देखील आता अनेक शेतकरी ब्लूबेरी फार्मिंग करत आहेत. अशाच एका शेतकऱ्याच्या आपण या लेखात यशोगाथा पाहणार आहोत ज्यांचा प्रवास हा फळ व्यापारी ते आज मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक शेती आणि एका एक्सपोर्ट कंपनीचे मालक असा आहे.

 अंबरीश प्रतापराय करवट यांची यशोगाथा

जर आपण यांचा विचार केला तर 1989 यावर्षी त्यांनी भारतामध्ये स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली व ती यशस्वी देखील करून दाखवली. त्या पाठोपाठ त्यांनी आता अमेरिकन ब्लूबेरी लागवड करून ती देखील यशस्वी करून दाखवलेली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत महाबळेश्वरच्या पाचगणी मध्ये नाहीतर संपूर्ण देशात व राज्यात मोठ्या प्रमाणावर आता स्ट्रॉबेरीची देखील लागवड केली जात आहे.

स्ट्रॉबेरी पाठोपाठ त्यांनी आता ब्लूबेरी लागवड करून यशस्वी केली व तीन वर्षापासून देशातील इतर शेतकऱ्यांना ब्लूबेरीची लागवड करण्याला देखील त्यांनी प्रोत्साहित केलेले आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने अमेरिकन ब्लूबेरी चे लागवड केली तर तो चांगला आर्थिक नफा देखील मिळवू शकतो. पाचगणीमध्ये त्यांनी ब्लूबेरीची शेती करणे सुरू केले असून आता या माध्यमातून ते लाखोंची कमाई करत आह

 ब्लूबेरी फळाचे महत्व

या फळाला सुपर फूड देखील म्हटले जाते व हे संपूर्ण जगात खूप प्रसिद्ध असे फळ आहे. भारताचा विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने ब्लूबेरी या फळाच्या आयात अमेरिकेकडून केली जाते. परंतु ब्लूबेरी फार्मिंग च्या संदर्भात गेल्या दहा वर्षापासून करवट हे सातत्याने अभ्यास करत आले व  आपल्याकडे ब्लूबेरी लागवड करणे आणि ती यशस्वी करून दाखवणे अवघड नाही हे त्यांना दिसून आले व सगळा अभ्यास व्यवस्थित करून त्यांनी चार वर्षांपूर्वी पाचगणीमध्ये ब्लूबेरीची शेती करायला सुरुवात केली व साडेतीन एकर शेतामध्ये प्रयोग म्हणून विविध प्रकारची शेती सुरू केली व हरितगृहाच्या माध्यमातून त्यांनी डोंगरावरील शेती सुपीक केली व त्या माध्यमातून ब्लूबेरी ची लागवड केली.

आता तुम्ही म्हणाल की अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर येणारे हे फळ आपल्याकडे वातावरणात टिकेल का? यांच्या लागवडीनंतर दिसून आले की भारताचा विचार केला तर साधारणपणे 42 अंश सेल्सिअस तापमान असते व या तापमानामध्ये ब्लूबेरीच्या अनेक प्रजातींची लागवड करता येणे शक्य आहे. ब्लूबेरी फार्मिंग चे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा लागवड केली तर तुम्हाला दहा वर्षे यापासून उत्पादन मिळत राहते. तसेच जसजसे झाडाचे वय वाढत जाईल तसतसे ब्लूबेरी फळाचे आकारमान देखील वाढत जाते.

 ब्लूबेरी शेतीची सर्वसाधारण माहिती

ब्लूबेरी ची लागवड करायची असेल तर ती साधारणपणे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये केली जाते व या पुढील वर्षाच्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये ब्लूबेरीला फलधारणा होत असते. त्यानंतर जून महिन्यापर्यंत याची काळजी तुम्ही करू शकतात व पावसाळ्याच्या वेळी ब्लूबेरी पिकाची छाटणी केली जाते.

लागवड करताना दोन ओळीतील अंतर कमीत कमी चार ते पाच फुटाचे व दोन रोपातील अंतर किमान दोन फूट असणे गरजेचे आहे. याकरिता जमिनीचा सामू पाहिला तर तो साडेचार ते साडेपाच इतका असणे गरजेचे आहे. जर यापेक्षा जमिनीचा सामू जास्त असेल तर तुम्ही सल्फरचा वापर करून त्याला कमी करू शकतात. तसेच शेणखत व गांडूळ खताचा वापर यासाठी फायद्याचा ठरतो. तसेच ठिबक सिंचनाचा वापर व मल्चिंग पेपरवर लागवड केली तर नक्कीच फायदा मिळतो.

 ब्लूबेरीच्या उत्पादन वाढीसाठी मधमाश्या आहेत टर्निंग पॉईंट

ब्लूबेरी फार्मिंग करत असताना करवट यांनी मधमाशी पालन आहे तो मधमाशांच्या बॉक्स देखील शेतामध्ये उभारले असून त्यांच्या अनुभवानुसार विचार केला तर ब्लूबेरी शेतीमध्ये मधमाशांची संख्या जितकी जास्त असेल तितकी फळांचे गुणवत्ता चांगली असते व आकारमान देखील चांगले मिळते. त्यामुळे मधमाशांचे संरक्षण व मधमाशी जास्त प्रमाणात याव्यात त्याकरता प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तसेच करवटे यांनी कीटक सापळ्याच्या माध्यमातून कीटकनाशकांवरचा खर्च देखील कमी केलेला आहे. जर आपण ब्लूबेरी उत्पादनाचा विचार केला तर साधारणपणे पहिल्या वर्षी 200 ते 300 ग्रॅम वजनाचे फळ आपल्याला मिळते. यामध्ये ब्लूबेरी लागवड करणारे बरेच शेतकरी ब्लूबेरी पिकाला फुलधारणा झाल्यानंतर त्यामध्ये जे काही पहिले फळ येते ते काढून टाकतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे पुढील वर्षापासून चांगले फळ मिळावे ही स्ट्रॅटेजी असते.

 एका एकरामध्ये एका वर्षात साठ लाखांपर्यंत होऊ शकते कमाई

एका एकराचे गणित पाहिले तर यामध्ये ब्लूबेरीची साधारणपणे तीन हजार रोपे लागवड केली जातात. चार वर्षाच्या लागवडीबद्दल विचार केला तर प्रत्येक झाडापासून आपल्याला दोन किलो पर्यंत ब्लूबेरीच्या फळाचे उत्पादन मिळते. म्हणजे आकडेवारी पाहिली तर तुम्हाला सहा हजार किलो ब्लूबेरी चे उत्पादन मिळते व प्रति किलो 1000 रुपयांचा दर पकडला तरी तुम्ही एका वर्षामध्ये साठ लाख रुपये आरामात कमवू शकतात.

ब्लूबेरी लागवडीला पाच वर्षे झाल्यानंतर एका झाडाच्या माध्यमातून पाच किलो ब्लूबेरी चे उत्पादन तुम्हाला मिळू शकते. म्हणजे यावरून जर अंदाज पकडला तर पाचव्या वर्षापासून उत्पादनात अडीच पट वाढ होते व आर्थिक उत्पन्नात तब्बल दीड कोटी रुपये इतकी कमाई होऊ शकते.

 ब्लूबेरीचे रोपे कुठे मिळतील?

साधारणपणे ब्लूबेरीची रोपे उत्तर अमेरिका आणि मेक्सिकेतून आपल्याकडे आणले जातात. आठशे रुपये प्रति रोप या दराने तुम्हाला या रोपांची खरेदी करता येणे शक्य आहे. परंतु आता आपल्या देशामध्ये देखील टिशू कल्चर तंत्रज्ञानाचा वापर करून रोपे तयार केले जात आहेत व ते कमी किमतीत मिळू शकतात.