Success Story: 25 वर्षाचा शेतकरी घेत आहे 2 एकर पेरू शेतीतून 12 लाखाचे उत्पादन!वाचा कसे केले आहे पेरूचे नियोजन?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story :- आजकाल आपण पाहिले तर अनेक तरुण हे शेतीकडे वळत असून मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीच्या पीक पद्धतींचा अवलंब शेतीमध्ये करताना दिसून येत आहेत. प्रामुख्याने नवीन येणाऱ्या तरुणांचा विचार केला तर ते फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळवत आहेत. एवढेच नाही तर  दर्जेदार असे फळांचे उत्पादन घेऊन निर्यात करून देखील उत्पादनात भर टाकत आहेत.

अशीच आपण जर एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर त्यांचे नाव मंगेश महादेव संकपाळ असे असून ते पलूस येथील राहणारे आहेत. मंगेश याचा विचार केला तर अगोदरपासून नोकरी करण्याची इच्छा नसल्यामुळे कुठलातरी व्यवसाय करावा हे मनात होते व घरची शेतीच आधुनिक पद्धतीने करण्याचा त्याने निर्णय घेतला. वास्तविक पलूस या परिसराचा विचार केला तर या ठिकाणी ऊस तसेच इतर पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.

परंतु या पारंपरिक पद्धतीच्या पिकांकडे न वळता काहीतरी नवीन करावे या उद्देशाने मंगेशने  पेरू लागवड करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांच्या वडिलांनी अगोदर एक एकर पेरू लागवड केलेली होती व मंगेश स्वतः शेती करायला लागल्यानंतर त्याने परत एक एकर क्षेत्रावर लागवड केली. म्हणजे त्याची एकूण आता  दोन एकर पेरू लागवड आहे. पेरू लागवडीला तीन वर्ष पूर्ण झाले असून त्याचे उत्पादन निघायला सुरुवात झाली आहे.

 अशाप्रकारे केले आहे पेरू बागेचे नियोजन

पेरू बागेचे नियोजन करताना पेरू फळांना फोम आणि पॉलिथिन चे वेस्टन केलेले असून जेणेकरून हानिकारक  कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि फळे दर्जेदार राहतील हा त्यामागचा उद्देश आहे.जेव्हा पेरूचे फळ लिंबूचे आकाराचे होते तेव्हा त्यांनी फोम पेरूच्या फळांना आच्छादित केले. एकूण दोन एकर मध्ये त्यांनी चौदाशे पन्नास झाडांची लागवड केलेली आहे. लागवड करताना दहा बाय सहा फूट अशी लागवड केलेली आहे.

लागवड करण्याच्या अगोदर त्यांनी समतल शेतामध्ये लागवड केलेली होती व त्या अगोदर मातीमध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून घेतले व त्यानंतर लागवडीकरिता व्यवस्थित बेड तयार करून घेतले. या संपूर्ण पेरू बागेला ठिबक सिंचनाच्या साह्याने पाणी व्यवस्थापन केले जाते. आजमीतिला या पेरू लागवड करायला तीन वर्षे पूर्ण झाले असून येणारे पंधरा ते वीस वर्षांपर्यंत या बागेतून उत्पादन निघेल असे मंगेश  यांनी माहिती देताना सांगितले. महत्वाचे म्हणजे झाडाची वाढ अनियंत्रित होऊ नये म्हणून काढणी झाल्यानंतर छाटणी केली जाते.

महत्त्वाचे म्हणजे पेरूची लागवड करताना त्यांनी व्हीएनआर या जातीची लागवड केलेली आहे. या जातीची रोपे त्यांना प्रतिरोप शंभर ते दीडशे रुपये पर्यंत त्यांनी खरेदी केलेली आहे. व्ही एन आर जातीच्या पेरूचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या एका फळाचे वजन एक किलो पर्यंत जाते. परंतु बाजारपेठेत चांगली मागणी राहावी म्हणून 300 ते 500 ग्रॅम वजन असलेल्या फळाची काढणी ते करतात. मंगेशने  बाजारपेठेचे विश्लेषण करताना म्हटले की जेव्हा आंब्याचे सीजन चालू असते तेव्हा पेरू बाजारपेठेत यायला नको. कारण आंब्याच्या सीझनमध्ये पेरूची मागणी कमी होते असे देखील महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. खतांचे नियोजन करताना अगोदर बेसल डोस तसेच ड्रीपच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्य तसेच फळाची फुगवण होण्याकरिता आवश्यक खतांचा पुरवठा ते करतात.

छाटणी केल्यानंतर 13:00:45,12:61:00 आणि मॅग्नेशियम सल्फेट प्रामुख्याने दिले जाते. त्यानंतर फळाची साईज वाढावी याकरिता 00:52:34,00:00:50 या खताचा पुरवठा ते करतात. त्यांच्या मते पेरूचे उत्पादन लागवडीनंतर पहिल्या वर्षी देखील घेता येणे शक्य आहे. परंतु ते टाळणे गरजेचे आहे कारण झाडाची वजन पेलण्याची क्षमता आणि त्याचा इतर दृष्टीने विकास होणे गरजेचे असल्यामुळे एका वर्षात बाग धरू नये. पाण्याचे नियोजन करताना उन्हाळ्यात दररोज एक तास पाणी दिले जाते व इतर वेळेस पिकाची गरज ओळखून पाण्याची नियोजन ते करतात.

पेरूवर येणाऱ्या किटकांची माहिती देताना त्यांनी म्हटले की प्रामुख्याने मिलीबग,पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. याकरिता ते शिफारशीत कीटकनाशकांच्या फवारण्या करतात तसेच उष्णतेपासून फळांचे नुकसान होऊ नये म्हणून पेपरने आच्छादन करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका वर्षाला दीड लाख रुपये खर्च या पेरू बागेसाठी येतो. तो बाजारपेठेतीलदाराचा विचार केला तर मंगेश याने म्हटले की त्यांनी पिकवलेले पेरू हा पन्नास रुपये किलो प्रमाणेच विकला गेला आहे.

यामध्ये योग्य वेळेत छाटणी आणि बाजारपेठेत माल केव्हा येईल हा दृष्टिकोन समोर ठेवून नियोजन करणे खूप गरजेचे असल्याचे देखील त्यांनी म्हटले. लेमन कलर चे फळ झाल्यानंतर ते फळाची काढणी करतात व बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग करून मुंबई, वाशी, दिल्ली तसेच हैदराबाद या ठिकाणी विक्रीसाठी पाठवतात.

साधारणपणे काढणी चालू झाल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत पेरूची काढणी केली जाते. बऱ्याचदा शेताच्या बांधावर येऊन व्यापारी त्यांच्या पेरूची खरेदी करतात. एका एकरामध्ये ते सध्या नऊ ते दहा टन उत्पादन घेत असून एका एकरात सहा लाख रुपये कमाई करत आहेत.