घर घ्या परंतु ‘या’ गोष्टी कटाक्षाने पहा! तरच होईल फायदा, नाहीतर येईल पश्चाताप करण्याची वेळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई,पुण्यासारख्या शहरांमध्ये किंवा इतर शहरांमध्ये स्वतःचे घर असावे ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु घरांच्या वाढत्या किमतींमुळे प्रत्येकाला घर घेणे शक्य होत नाही.जर आपण घर घ्यायचे ठरवले तर यामध्ये आपल्याला एकदाच गुंतवणूक करता येते. म्हणजे परत परत आपल्याला घर घेता येत नाही.

त्यामुळे घर घेताना आवश्यक महत्त्वाच्या गोष्टी पाहणे खूप गरजेचे असते. समजा तुम्हाला एखाद्या वेळेस भविष्यकाळात घर विकायचे असेल तर संबंधित व्यक्तीकडून अनेक गोष्टी पाहिल्या जातात व तरच चांगली किंमत त्या घराची आपल्याला मिळू शकते. त्यामुळे घर खरेदीचा व्यवहार जर तुम्हाला फायदेशीर बनवायचा असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यासंबंधीची माहिती आपण या लेखात घेऊ.

 घर घेताना या गोष्टींची घ्या काळजी

1- घराचे लोकेशन म्हणजेच ठिकाण तुम्ही ज्या ठिकाणी घर घेत आहात तो परिसर जर चांगला असेल म्हणजेच त्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा असतील तर येणाऱ्या भविष्यकाळ जर तुम्हाला घर विकायचे असेल तर त्याची तुम्हाला मनासारखी किंमत मिळू शकते. घर हे बस स्थानक तसेच रेल्वे स्टेशन किंवा एखाद्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे ट्रान्सपोर्ट पासून जवळ असणे गरजेचे आहे. हे भविष्यकालीन घराची चांगली किंमत मिळण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे.

2- तुमचा आर्थिक बजेट पहा घर घेताना तुमचा आर्थिक बजेट नेमका किती आहे? हे बघणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती पैसे वाचवावे लागतील म्हणजेच पैशांची किती बचत करावी लागेल याचा अंदाज येऊ शकतो. जर घर घेतले तर कमीत कमी पंधरा ते वीस वर्षे ते विकण्याचा आपण सहसा विचार करत नाही. भविष्यकालीन सगळ्या गोष्टींचा विचार करून घर घेणे गरजेचे आहे.

3- परिसरातील घराचे भाडे बरेच व्यक्ती गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून घर विकत घेतात. म्हणजेच स्वतः घरात राहायला न जाता ते भाडे करू म्हणजेच भाड्याने घर देतात. तुम्हाला इन्कम मिळवण्याच्या दृष्टिकोनातून घर विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला ज्या परिसरामध्ये घर घ्यायचे आहे त्या ठिकाणच्या इतर घरांचे किती भाडे मिळते?

याचा विचार करणे तुम्ही गरजेचे आहे. साधारणपणे ज्या परिसरापासून स्टेशन, बाजार तसे शाळा किंवा हॉस्पिटल जवळ असतात अशा घरांना अधिक भाडे मिळते. त्यामुळे घर घेताना या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.

4- पुनविक्रीच्या दृष्टिकोनातून योग्य किमतीचा अभ्यास कोणत्याही घरामध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा ती गुंतवणूक करताना त्या घराची काही वर्षांनी विक्री केली तर तुम्हाला किती किंमत मिळू शकते याचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे.

त्यामुळे सर्व सोयी सुविधा घराच्या जवळ असणे खूप गरजेचे आहे व घर विकत घेताना या आवश्यक सोयी सुविधा घराजवळ आहेत का किंवा परिसरात आहेत का हे पाहणे महत्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्ही भविष्यकाळात घर विक्रीला काढले तर तुम्हाला चांगली किंमत मिळू शकते.

5- होमलोन घ्यायचे असेल तर तुमची पात्रता तपासा तुम्हाला जर होम लोन घेऊन घर विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला किती कर्ज मिळू शकते याचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही घेतलेले कर्ज कशा पद्धतीने परत करू शकतात यावर तुमचे पात्रता ठरत असते. यामध्ये तुमचे उत्पन्न, तुमचे वय तसेच तुमच्यावर असलेली इतर महत्त्वाचे दायित्वे म्हणजेच जबाबदाऱ्या इत्यादी गोष्टी पाहून तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाचे स्वरूप किंवा रक्कम ठरत असते. त्यामुळे पात्रता पासून घेणे गरजेचे आहे.

6- स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी तुम्हाला नवीन घरासाठी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्हाला ज्या शहरांमध्ये घर घ्यायचे त्या ठिकाणची स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी नेमकी किती आहे किंवा तिचे दर काय आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणजे वेळेला तुम्हाला पैशांची अडचण येणार नाही.

7- घराचा विमा काढणे घराचा विमा काढणे हा भविष्यकालीन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे असून जर भविष्यात घराला कोणत्याही प्रकारची हानी किंवा नुकसान झाले तर तुम्हाला या माध्यमातून आर्थिक संरक्षण मिळू शकते. घराची जी काही किंमत असेल त्या किमतीच्या तुलनेमध्ये विम्याचा हप्ता हा खूपच कमी असतो व या कमीत कमी रकमेत तुम्हाला संपूर्ण घराला संरक्षण मिळते.