केंद्र सरकारने ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली 12 टक्के वाढ! वाचा किती वाढणार पगार?

महागाई भत्त्यातील वाढ ही त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे जे केंद्रीय कर्मचारी आणि स्वायत्त संस्था( सार्वजनिक उपक्रम विभाग) च्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे जे पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगानुसार पगार घेत आहेत.

Ajay Patil
Published:
da hike

DA Hike:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेल्या डीए अर्थात महागाई भत्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकतीच करण्यात आली.

आता करण्यात आलेली ही महागाई भत्त्यातील वाढ ही त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे जे केंद्रीय कर्मचारी आणि स्वायत्त संस्था( सार्वजनिक उपक्रम विभाग) च्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे जे पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगानुसार पगार घेत आहेत. महत्वाचे म्हणजे वित्त मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रम विभागाने 7 नोव्हेंबर 2024 रोजी याबाबत कार्यालयीन निवेदन देखील जारी केले आहे.

कसे असतील आता सहाव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून वाढवण्यात आलेल्या महागाई भत्त्याचे नवीन दर?
सहाव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सध्याच्या 239 टक्क्यांवरून 246 टक्के इतका करण्यात आला असून करण्यात आलेली ही वाढ एक जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. सहाव्या वेतन आयोग अंतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे.

जर आपण हे उदाहरणाने समजून घेतले तर ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 43 हजार रुपये असेल तर पूर्वी त्याला 239% महागाई भत्त्याच्या अंतर्गत एक लाख 2 हजार 770 रुपये मिळत असतील.

तर आता वाढवण्यात आलेल्या 246 टक्क्यांच्या नवीन दरानुसार आता महागाई भत्ता वाढून एक लाख 5 हजार 780 रुपये इतका होणार आहे. म्हणजे सोप्या भाषेत समजायचे म्हटले म्हणजे दरमहा तीन हजार रुपयांनी पगारात वाढ होणार आहे.

पाचव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्याचे नवीन दर
पाचव्या वेतन आयोगानुसार पगारदार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता सध्याच्या 443 टक्क्यांवरून 455 टक्के इतका करण्यात आला आहे. वाढवलेला हा दर एक जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे पाचव्या वेतन आयोग अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 12 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्त्याचे सध्याचे दर
आपल्याला माहित आहे की जे कर्मचारी सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार व इतर सुविधा घेत आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शन धारकाच्या महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत या आधीच केंद्र सरकारच्या माध्यमातून वाढ करण्यात आलेली आहे व ही वाढ 50% वरून 53% इतकी करण्यात आली असून एक जुलै 2024 पासून ती लागू राहणार आहे.

आपल्याला माहित आहे की केंद्र सरकार प्रत्येक वर्षी जानेवारी आणि जुलै अशा दोन कालावधीमध्ये महागाई भत्त्यात सुधारणा करत असते. या सुधारणेमुळे पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोग अंतर्गत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये आता या वाढीचा लाभ मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe