New Pension System:- देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पेन्शनधारक असून दरवर्षी निवृत्त होणाऱ्यांची संख्या देखील मोठी असते. आपल्याला माहित आहे की, ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पीएफ संदर्भातील आणि पेन्शन संदर्भातील महत्त्वाच्या बाबींचे नियमन केले जाते.
आपल्याला माहित आहे की, कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर पेन्शन सुरू करताना पेन्शनधारकांना पडताळणी करता बँकेत जावे लागते. यासोबतच बऱ्याच गोष्टी पेन्शनधारकांना करणे भाग असते. परंतु आता यामध्ये बरेच नियम बदलण्यात आले असून पेन्शनधारकांना पेन्शन मिळण्याच्या दृष्टिकोनातून नियमातील हे बदल खूप फायदेशीर ठरणार आहे.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीया यांनी शुक्रवारी कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत सीपीपीएस अर्थात सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टमची पायलट चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा केली.
यामध्ये कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत आता सेंट्रलाईज्ड पेन्शन पेमेंट सिस्टममध्ये उल्लेखनीय असे बदल या पायलट चाचणीमुळे आता घडून येतील व पेन्शन सुरू करताना पेन्शन धारकांना पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. तसेच पेन्शन सुरू सुरू होताच थेट पेन्शन धारकांच्या बँक खात्यात ते जमा होईल.
पेन्शन वितरण करण्यासाठी आता नवीन प्रणाली
नवीन सेंट्रलाइज्ड पेन्शन सिस्टमची घोषणा करताना मांडविया यांनी म्हटले होते की, सेंट्रलाइज्ड पेन्शन सिस्टम प्रणाली अर्थात सीपीपीएस हा इपीएफओच्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आता या नवीन प्रणालीमध्ये पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन कोणत्याही बँक,
कोणत्याही बँकेच्या शाखेत तसेच देशात कुठेही मिळण्यास सोयीस्कर होणार आहे. तसेच बऱ्याच वर्षांपासून पेन्शनधारकांसमोर जे आव्हाने किंवा समस्या होत्या त्या आता या उपक्रमामुळे कमी होणार आहेत. नवीन नियमामुळे किंवा प्रणालीमुळे आता एक कार्यक्षम पेन्शन वितरण यंत्रणा सुनिश्चित होणार आहे.
याबद्दल बोलताना मनसुख मांडविया यांनी म्हटले होते की, ईपीएफओ सदस्य आणि पेन्शनधारकांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी ईपीएफओला अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला अधिक मजबूत व तंत्रज्ञान सक्षम संस्थेमध्ये रूपांतरित करण्याचे जे काही सरकारचे प्रयत्न होते त्यातीलच एक पाऊल आहे.
काय आहे नवीन पेन्शन प्रणाली?
आता या सीपीपीएस पेन्शन योजनेमुळे पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन घेता येणार आहे. त्याच्या नवीन पेन्शन प्रणाली अंतर्गत पेन्शनधारकांना बँक बदलताना किंवा खाते हस्तांतरित करताना पेन्शनसाठी बँकेत जाण्याची गरज नाही. तर पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँक आणि कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन मिळणार आहे.
त्यामुळे रिटायरमेंट नंतर जे कर्मचारी गावी जाऊन राहतात त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा असणार आहे. या पेन्शन प्रणाली विषयीची पायलट चाचणी 29 ते 30 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली असून या प्रणालीनुसार जम्मू, श्रीनगर आणि कर्नल विभागातील 4900 पेक्षा अधिक ईपीएस पेन्शनधारकांना ऑक्टोबर २०२४ साठी सुमारे 11 कोटी रुपयांचे पेन्शन या माध्यमातून वितरित करण्यात आले आहे.
त्यामुळे आता देशातील लाखो पेन्शनधारकांना या प्रणालीचा फायदा होणार आहे.