या शेतकऱ्याने कलकत्ता पानमळाच्या शेतीतून महिनाभरात कमावले दीड ते दोन लाखाचे उत्पन्न,वाचा यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस उत्पादन घेणे आता शक्य झाले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध पीक पद्धती यामुळे शक्य झालेले आहे. अनेक शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागल्यामुळे  आणि शेतकऱ्यांमध्ये असलेल्या प्रयोगशीलता हा गुण शेती क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा ठरताना दिसून येत आहे. बरेच शेतकरी आता शेतीमध्ये विविध प्रकारच्या पिक लागवडीचा प्रयोग मोठ्या प्रमाणावर करत असल्यामुळे असे प्रयोग करत असताना ते यशस्वी देखील होत आहेत.

परंपरागत शेती आणि परंपरागत पिके आता काळाच्या ओघात गेली असून त्याची जागा आता आधुनिक शेती पद्धत आणि आधुनिक पिकांची लागवड यांनी घेतली आहे. तसेच आता सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून अनेक महत्त्वपूर्ण माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत असल्याने अनेक शेतकरी सोशल मीडियाचा वापर करून देखील अनेक प्रयोग शेतीत करत आहेत व शासकीय योजनांचे पाठबळ शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे शेती आता समृद्ध होताना दिसून येत आहे. याच मुद्द्याला धरून जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क युट्युब च्या मदतीने कलकत्ता पानमळ्याची शेती यशस्वी केली आहे. याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 अकोल्यातील शेतकऱ्यांनी कलकत्ता पानमळ्याची शेती केली यशस्वी

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, रामचंद्र टीकाराम बरेठिया हे अकोला जिल्ह्यातील शेतकरी असून त्यांचे वय 65 वर्षे इतके आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्र असून ते यामध्ये अनेक प्रकारचे पारंपरिक पिके व फळबाग लागवड करतात. परंतु वेगळ्या प्रकारचे शेतीमध्ये प्रयोग करण्यात देखील ते पुढे असतात.

याच माध्यमातून काहीतरी वेगळा प्रयोग करावा असं त्यांच्या मनात सुरू असतानाच त्यांना कलकत्ता पानाबद्दल माहिती मिळाली. कलकत्ता पान हे बाजारामध्ये पाच ते सहा रुपये प्रमाणे मिळते व पान ठेल्यावर तर त्याचा विचार केला तर ते 20 ते 25 रुपये दराने विक्री होते. हे त्यांना समजताच त्यांनी याबाबतीत व्यवस्थित प्लॅनिंग केली व कलकत्ता पान लागवडीचा निर्णय घेतला.

याविषयी संपूर्ण माहिती घेत असताना त्यांना हे पीक आपल्याकडे जास्त प्रमाणात येत नाही परंतु बाहेरील राज्यातून आपल्याकडे मोठी मागणी असते. त्यामुळे त्यांनी youtube चे मदत घेतली व उपविभागीय कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे व इतर अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन कलकत्ता पानाची लागवड करण्याचे निश्चित केले. तसेच मध्य प्रदेश राज्यातील हरदा बाखे आणि जोशी या शेतकऱ्यांच्या कलकत्ता पानमळ्याला भेट दिली व त्यांच्याकडून संपूर्ण माहिती समजून घेतली. यानंतर त्यांनी कलकत्ता पानमळा लागवडीचा निश्चय केला.

 शासकीय  योजनांची घेतली मदत

याकरिता त्यांना शासकीय योजनांची देखील खूप मोठ्या प्रमाणावर आधार मिळाला. शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी 2021-22 मध्ये शेडनेट हाऊस मिळवले व साडेबारा लाख रुपयांचा खर्च करून शेडनेट हाऊसची  उभारणी केली. यातून त्यांना 80% शासकीय अनुदानाचा लाभ मिळाला.

तसेच माती परीक्षण देखील व्यवस्थितपणे करून घेतले व मागच्या आठ महिन्यापूर्वी शेडनेट हाऊस उभे केले व पुढच्या तयारीला लागले. कलकत्ता पानाच्या लागवडीकरिता त्यांनी शेडनेटमध्ये मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाची व्यवस्थित सोय केली व पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले. लागवड करण्याकरिता त्यांनी कलकत्ता मिठा पान लालदंडी म्हणून ओळखला जाणाऱ्या या पानाची 5000 वेलींची रोपे कलकत्ता या ठिकाणहून आणली. ही रोपे त्यांना एक लाख पाच हजार रुपयांना मिळाली. लागवड करण्याअगोदर त्यांनी कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला व मार्गदर्शन

घेतले व गेल्या सहा महिन्यापूर्वी त्यांनी शेडनेट हाऊस मध्ये त्याची लागवड केली. आता वेलींची वाढ पूर्ण झाली असून पान हे तोडणीला आहे. तसेच इतर व्यवस्थापन करताना त्यांनी तज्ञांचा व्यवस्थित सल्ला घेऊनच सगळे नियोजन केले. कलकत्ता पानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते आता पुढील दहा वर्षापर्यंत टिकणार असून तोपर्यंत त्यांना उत्पन्न मिळणार आहे. आता त्याची तोडणी चालू झाल्यानंतर 11 महिन्यांपर्यंत त्याची तोडणी चालू राहते व चार महिने थोडं  बंद ठेवावे लागते.

आता हा पहिला बहार असून यामध्ये प्रत्येक वेलीची पाच पाने तोडण्यात येतील व याप्रमाणे पहिल्या तोडामध्ये 25000 तर दुसऱ्या तोडणीत 25 आणि तिसऱ्या मध्ये 25000 अशी तिसऱ्या  महिन्यात 75000 पाने विक्रीसाठी उपलब्ध होतील. साधारणपणे हे पान तीन ते पाच रुपयांपर्यंत विकले जाण्याची शक्यता त्यांना आहे व यानुसार एका महिन्याभरात त्यांना दीड ते दोन लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न मिळू शकण्याचा त्यांना अंदाज आहे.

तसेच ही पाने विक्रीकरिता ते नागपूर बाजारपेठेची निवड करणार असून त्या ठिकाणी त्यांची विक्री करणार आहेत. विशेष म्हणजे पाणी देणे व खते देणे इथपासून सगळी कामे ते स्वतः करतात. भविष्यातील त्याची मागणी पाहता आणखी पानमळा लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे. विशेष म्हणजे रामचंद्र बरेठिया यांचा कलकत्ता पान लागवडीचा हा पश्चिम विदर्भातील पहिलाच प्रयोग असल्याचे सांगण्यात येत आहे.