मित्रांनी दाखवली एकी आणि सुरू केला फार्म टू प्लेट ब्रँड! नैसर्गिक उसापासून बनवलेल्या उत्पादन विक्रीतून मिळवत आहेत उत्तम नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता व त्या ठिकाणी काही गोष्टी बघता व त्यावरून तुम्हाला अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात. एखाद्याचा व्यवसाय किंवा एखाद्या व्यक्तीची काही गोष्टी बघून आपल्यालाही वाटतं की आपण देखील असंच काहीतरी करावं.

परंतु मनात आलेली ही कल्पना सत्यात उतरवणे म्हणजे त्याकरिता नक्कीच तुम्हाला त्यासाठी आवश्यक गोष्टी करणे गरजेचे असते. परंतु सगळ्यात अगोदर ती कल्पना तुमच्या मनात आल्यानंतर ती सत्यात उतरावी किंवा तुम्हाला कल्पना सत्यात उतरावयाची आहे याची इच्छा तुमच्या मनामध्ये जागृत होणे ही पहिली पायरी असते.

मग तुम्ही हळूहळू या गोष्टींचा अभ्यास करून आलेली कल्पना सत्यात उतरू शकतात. अगदी याच मुद्द्याला धरून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नंदकिशोर घावटे, संजय केदारे, दिगंबर लाटे आणि आर.आर.घावटे हे हुरडा पार्टीसाठी एकदा बाहेर गेलेले होते.

जेव्हा त्यांनी या हूरडा पार्टीला हजेरी लावली तेव्हा त्यांच्या मनामध्ये आले की आपण देखील असंच काहीतरी सुरू करावे. परंतु हे चौघेजण विचार करून थांबले नाहीत तर त्यांनी हुरडा पार्टी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्याकरिता नंदकिशोर घावटे याची जालना महामार्गावर सटाणा ता.जि.छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रोड टच दीड एकर जमीन आहे व त्या ठिकाणी नंदकिशोर यांनी हुरडा पार्टी करिता जागा देण्याची तयारी दाखवली व चौघ मित्र मिळून त्यांनी हुरडा पार्टीचा हंगाम आर्थिक दृष्ट्या यशस्वी केला.

परंतु हा हंगाम संपल्यानंतर मात्र आता पुढे काय करायचे? हा प्रश्न चौघांच्या मनामध्ये आला. याबाबत चाचपणी सुरू असतानाच रसवंतीची कल्पना त्यांना सुचली व त्यातूनच जन्म झाला उसाच्या फार्म टू प्लेट ब्रँडचा.

 चौघे मित्रांनी उभारला विविध खाद्यपदार्थांचा फार्म टू प्लेट ब्रँड

या चौघे मित्रांनी सुरू केलेला हुरडा पार्टीचा हंगाम संपल्यानंतर त्यांनी रसवंती सुरू करण्याचा निर्णय घेतला. उसापासून किंवा उसाच्या रसापासून कुठले पदार्थ तयार करता येतात या खाद्यपदार्थाच्या प्रशिक्षण संस्थेची माहिती त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली.

यामध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले व जानेवारीपासून या चौघा मित्रांनी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे शेतकरी नैसर्गिक पद्धतीने ऊस लागवड करतात त्यांच्याकडून ऊस घ्यायला सुरुवात केली व तो ऊस त्यांना घरपोच सहा ते सात रुपये किलो दराने मिळत आहे व या उसापासून त्यांनी विविध पदार्थ बनवायला सुरुवात केली

व त्यांची विक्री देखील ते करतात. त्यांनी उसाच्या रसवंतीवर नुसता उसाचा रसच नाही विकला तर त्या पुढे जात त्यांनी या रसापासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करायला सुरुवात केली व त्यांच्या विक्रीतून हे चौघे मित्र आज चांगला आर्थिक नफा मिळवत आहेत.

 गन्ना चुस्की आहे फार्म टू प्लेट ब्रँडचे मुख्य आकर्षण

या चौघा मित्रांचा फार्म टू प्लेट या ब्रँडचे मुख्य आकर्षण म्हणजे त्यांनी तयार केलेली गन्ना चुस्की हे होय. गन्ना चुस्की हे उसाचा रस आणि गिर गाईचे शुद्ध देशी दूध यांचे मिश्रण करून ते तयार करतात. बाजारामध्ये पंधरा ते वीस रुपयांना सहजतेने विक्री केली जाते.

यामध्ये एकाच वेळी पूर्ण उसाचा रस काढणारे आधुनिक ऊस रस मशीन, दूध तसेच फ्रीज आणि कुल्फीचे साचे इत्यादी साहित्य घेऊन एक व्यक्ती एका दिवसाला 250 ते 300 गन्ना चुस्की म्हणजेच गुल्फी तयार करू शकतो.

या एका गन्ना चुस्की अर्थात कुल्फीच्या विक्रीतून सरासरी 60 टक्के आर्थिक फायदा त्यांना मिळत आहे. यासोबतच गन्ना हर्बल चहा देखील ते बनवतात व हा चहा विनासाखर, चहा पत्ती शिवाय  बनवला जातो व यामध्ये फक्त उसाचा रस आणि काही मसाले मिसळून हा चहा तयार केला जातो.

याशिवाय गन्ना फ्रोजन ज्यूस, उसाच्या रसापासून तयार केलेला पेढा म्हणजेच गन्ना पेढा आणि गन्ना इमली चटणी इत्यादी पदार्थ देखील बनवतात व त्यांची विक्री करतात.

 कसे आहे विक्रीचे व्यवस्थापन?

सध्या ते परिसरातील काही ठराविक दुकानांच्या माध्यमातून या गन्ना कूल्फीचे दिवसाकाठी पाचशे नगांची विक्री करत असून मागणीनुसार इतर पदार्थांची विक्री देखील ते करत आहेत. नंदकिशोर याची घरची जागा असल्यामुळे जागा भाडे वाचत असल्याने इतर खर्च वजा जाता त्यांना नोकरीपेक्षा चांगला पैसा या माध्यमातून मिळत आहे.