Gold Rate:- सध्या सोन्याचे दर उच्चांक पातळीवर असून सोन्या सोबतच चांदीच्या दरांनी देखील एक प्रकारे रेकॉर्ड प्रस्थापित केलेले आहे. त्यामुळे लग्नसराईच्या कालावधीत सोने खरेदी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर दमछाक होताना दिसून येत असून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना सोन्याच्या खरेदीसाठी खर्च करावा लागत आहे.
तसेच गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हे एक चांगले दिवस म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आता येणाऱ्या कालावधीमध्ये सोन्याचे दर कसे राहतील किंवा त्यात वाढ होईल की घट होईल? परंतु जर आपण सोन्याच्या दरांचा विचार केला तर त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा खूप मोठा परिणाम होत असतो व जगभरातील भूराजकीय तणाव आणि युद्धासारख्या परिस्थितीमुळे देखील अनेकदा सोन्याचे भाव वाढतात.
अशीच युद्ध आणि भूराजकीय तणाव सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर दिसून येत असल्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये ही वाढ दिसून येत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे व त्यामध्ये सध्या इराणमध्ये घडलेली एक घटना कारणीभूत ठरू शकते.
येणाऱ्या कालावधीत सोन्याचे भाव जातील 75 हजाराच्या पुढे?
गेल्या काही दिवसापासून सोन्याचे दर कमी झालेले दिसून येत होते.परंतु यामध्ये आणखी पुन्हा एकदा वाढ होईल अशी एक शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नुकतीच एक घटना घडली व तिचे पडसाद सोन्याच्या भावावर उमटू शकतात. आपल्याला माहित असेलच की इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला व यामुळे मध्यपूर्वेकडील देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे व या भूराजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या दरात एक टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
सध्या जर आपण सोन्याची स्पॉट किंमत पाहिली तर ती 2435 डॉलर प्रतिऔंस वर व्यवहार करत असून जूनमध्ये गोल्ड फ्युचर 2444.55 प्रति औंस डॉलर या विक्रमी पातळीवर पोहोचले असल्यामुळे येणाऱ्या कालावधी सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. एमसीएक्स वर देखील सोने चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा मृत्यू हे कारण सोन्याच्या दरवाढीला कारणीभूत ठरू शकते व याशिवाय अमेरिकेत देखील व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
म्हणजे जगभरातील युद्ध आणि भूराजकीय तणावामुळे सोन्याच्या किमतीत अनेकदा वाढ झालेली असून अशाच प्रकारे इजराइल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धामुळे मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये सोन्याच्या किमतींमध्ये अशाच प्रकारे जगात वाढ झाली होती. सध्या सोने व चांदीच्या दरात विक्रमी पातळीवर वाढ झाली असून उच्चांकी पातळीवरती व्यवहार करत आहेत
राष्ट्राध्यक्षांच्या या मृत्यूच्या घटनेमुळे जर मध्यपूर्व मध्ये तणाव वाढला तर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जर इराण मधील या घडलेल्या घटनेनंतर जर मध्यपूर्वे कडील देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली तर मात्र सोन्याने चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या एमसीएक्स बाजारपेठेमध्ये सोन्याला 73 हजार 200 ते 72 हजार 700 या पातळीवर महत्त्वाचा आधार असून यामध्ये मोठा रेजिस्टन्स 74 हजार ते 74 हजार 500 रुपये इतका आहे.