Tax Saving Tips: ‘हे’ मार्ग तुम्हाला करबचत किंवा करात सूट मिळवण्यासाठी करतील मदत! वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tax Saving Tips:- नोकरी करणारे तसेच व्यावसायिक व्यक्तींना आयकर रिटर्न भरणे गरजेचे असते व लाखोंच्या संख्येने भारतामध्ये नागरिक कर भरत असतात. साधारणपणे प्रत्येक वर्षी 31 मार्चपर्यंत या संबंधीची प्रक्रिया करणे गरजेचे असते.

त्यामुळे जर नोकरी करणारे व्यक्ती असतील तर त्यांना कर वाचवण्याकरिता गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज कार्यालयामध्ये जमा करणे देखील गरजेचे असते. समजा तुम्हाला या 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अशा पद्धतीने कागदपत्रे सबमिट करायचे असेल तर त्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे.

परंतु यामध्ये बऱ्याचदा आपल्याला समजत नाही किंवा माहीत नसते की कर बचत करण्यासाठी असे कुठले पर्याय आहेत की ज्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करून कर बचतीचा किंवा कर वाचवण्याचा लाभ घेऊ शकतात. त्याबद्दलचीच माहिती या लेखात बघू.

 कर बचतीसाठीचे उत्तम पर्याय

1- नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक- तुम्ही जर नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात एनपीएस या योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही यावर कलम 80CCD(1B) अंतर्गत अतिरिक्त पन्नास हजार रुपये कर वाचवू शकतात

व या कलमांतर्गत तुम्ही एक लाख पन्नास हजार रुपये पर्यंत बचत करू शकतात.  साधारणपणे तुमची एकूण या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.

2- आरोग्य विमा प्रीमियमवर सूट मागू शकता- समजा तुम्ही आरोग्य विमा घेतलेला असेल तर तुम्ही त्या विम्याच्या प्रीमियमवर देखील सूट मागू शकतात. किती कर सुट मिळणार हे तुमच्या पॉलिसीमध्ये कुणाचा समावेश आहे व संबंधित व्यक्तीची वय काय आहे

यावर ते सगळे अवलंबून असते. परंतु तरीदेखील अंदाजे तुम्ही 25 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत कर या माध्यमातून वाचवू शकतात. यासंबंधीचा लाभ प्रामुख्याने आयकर कलम 80D अंतर्गत मिळतो.

3- शैक्षणिक कर्जाच्या व्याजभागावर कर सुट(80E अंतर्गत)- यामध्ये तुम्ही शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर त्याच्या व्याजावर कर सूट मिळू शकते व ही सूट पालक किंवा मुल दोघांना देखील मिळते. यामध्ये फक्त कर्जाची परतफेड कोण करणार आहे यावर ते अवलंबून असेल.

4- पहिले घर खरेदी केल्यावर गृह कर्जाच्या व्याजावर अतिरिक्त सूट(80EE अंतर्गत)- या कलमांतर्गत तुम्ही पहिले घर खरेदी केले असेल व त्याच्यावर गृहकर्ज घेतले असेल तर गृहकर्जाच्या व्याजावर अतिरिक्त सूट तुम्हाला उपलब्ध होते.

परंतु या अगोदर  तुमच्या नावावर कुठले घर नसावे. या कलमाच्या माध्यमातून तुम्हाला 50 हजार रुपये पर्यंतची अतिरिक्त सूटसाठी दावा करता येऊ शकतो. म्हणजेच पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांना एका वर्षात होम लोनच्या व्याजावर अडीच लाख रुपयांपर्यंतची सूट मिळते.

परंतु यामध्ये एक महत्त्वाची अट अशी आहे की मालमत्तेची किंमत 50 लाख रुपयांपेक्षा कमी आणि कर्जाची रक्कम 35 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

5- अपंग व्यक्तीच्या काळजीवर झालेला खर्च(80DD अंतर्गत)- अपंग व्यक्तीच्या काळजी घेण्यावर जर काही खर्च होत असेल तर या कलमाच्या माध्यमातून तुम्ही कर सुटसाठी दावा करू शकतात.

या माध्यमातून 75 हजार ते एक लाख 25 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. परंतु मिळणारी ही सूट अपंग व्यक्तीचे अपंगत्व किती आहे यावर अवलंबून असते.

6- भाड्यावर कर सुट(80JJ)- तुम्ही पगारदार व्यक्ती आहात आणि कंपनी तुम्हाला घर भाडेभत्ता देत

असेल तर तुम्हाला भाड्यावर कर सुट मिळू शकते. यामध्ये घर भाडेभत्ता अर्थात एचआरएची उपलब्धता नसेल तर तुम्ही घर भाड्यावर सूट मागू शकत नाही.

7- बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर सूट(80tta)- या माध्यमातून तुम्हाला बचत खात्याच्या माध्यमातून जे काही व्याज मिळते त्यावर देखील कर सुट मिळू शकते.

या कलमाच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाला कमाल दहा हजार रुपयापर्यंत कर सूट मिळू शकते. परंतु यामध्ये अट अशी आहे की तुमचे बचत खाते ही बँक, सहकारी संस्था किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असणे गरजेचे आहे.