व्यवसाय म्हटले म्हणजे यामध्ये भली मोठी व्यवसायांची यादी तयार होते. अनेक छोट्या व मोठ्या स्वरूपातील व्यवसाय असून यामधून व्यवसायाची निवड करून व्यवसाय सुरू करायचा असेल तर स्वतःची आर्थिक क्षमता आणि व्यवसायास असलेली मागणी या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून व्यवसायाची उभारणी करतात.
व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक पाहिली तर ती व्यवसायाचे स्वरूप कसे आहे म्हणजेच व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरू करायचा आहे की छोट्या प्रमाणामध्ये यावर ते अवलंबून असते. व्यवसायामध्ये तुम्ही किती गुंतवणूक करता आहात यापेक्षा तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहात तो कितपत चालू शकणारा आहे.
तसेच त्याला ग्रामीण भागामध्ये मागणी आहे की शहरी भागामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करून व्यवसाय सुरू करणे गरजेचे असते. परंतु या बाबतीत बरेच जण व्यवसाय सुरू करण्याआधी कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करता येईल व मागणी देखील चांगले राहील अशा व्यवसायाच्या शोधात असतात
त्यामुळे अशा व्यक्तींना मदत होईल म्हणून या लेखांमध्ये आपण अशा काही व्यवसायांची माहिती बघणार आहोत जे तुम्ही एक लाख रुपये पासून सुरु करू शकतात. एवढेच नाही तर हे व्यवसाय तुम्ही ग्रामीण किंवा शहरी भागांमध्ये कुठेही सुरू करून चांगला पैसा मिळवू शकतात.
एक लाखात सुरु करा हे व्यवसाय
1- कुरिअरचा व्यवसाय– कुरिअरचा व्यवसाय हा एक चांगला पैसा देणारा व्यवसाय असून हा व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुम्ही कोणत्याही कुरिअर कंपनीची टायअप करून सुरू करू शकता आणि त्यांच्या सेवा ग्राहकांना देऊ शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःची कुरियर कंपनी देखील उभारू शकतात.
सुरुवातीला अगदी छोट्या प्रमाणामध्ये तुम्ही कुरिअरची सर्विस सुरू करू शकतात. यामध्ये तुम्ही अनेक कंपन्यांचा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवू शकतात. जर यामध्ये तुमच्याकडे स्वतःची कार असेल तर तुम्ही एक लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करून चांगला पैसा मिळवू शकतात.
2- मोबाईल रिपेरिंग– तुमच्याकडे एक लाख रुपये असतील तर तुम्ही मोबाईल रिपेरिंग शॉप सुरू करू शकता व चांगला पैसा मिळवू शकतात.
आज ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो प्रत्येक ठिकाणी मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे हा व्यवसाय तुम्ही अगदी एक लाख रुपये गुंतवणूक करून सुरू करू शकता व चांगला पैसा मिळवू शकता.
3- फुलांचा व्यवसाय– आज-काल वाढदिवस असो किंवा लग्न व इतर कार्यक्रम असो यामध्ये फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
मंदिरातील पूजेपासून ते घरांच्या सजावटीसाठी फुलांचा वापर होत असल्यामुळे फुल विक्रीच्या व्यवसायाला देखील खूप मोठा आर्थिक आधार आहे. त्यामुळे तुम्ही एक लाख रुपये टाकून हा व्यवसाय कुठेही सुरू करून चांगला पैसा मिळवू शकतात.
4- होम गार्डनिंग व्यवसाय– होम गार्डनिंग हा व्यवसाय तुम्ही तुमचे टेरेस,घराचा बगीच्या किंवा भाड्याच्या जागेवर सुरू करू शकतात. या व्यवसायामध्ये तुम्ही अनेक प्रकारची बियाणे तसेच खतांसह वनस्पतींची लागवड करून ते वाढवू शकतात
व त्यानंतर ऑनलाईन किंवा कोणत्याही विक्री प्लेटफॉर्मच्या मदतीने तुम्ही वाजवी दरामध्ये त्यांची विक्री करू शकतात. म्हणजेच तयार रोपांची विक्री या व्यवसायामध्ये अपेक्षित असते. तुम्ही एक लाख रुपये गुंतवून होम गार्डनिंग व्यवसाय सुरू करू शकतात.
5- कार धुण्याचा म्हणजेच कार वाशिंग व्यवसाय– शहरामध्ये या व्यवसायाला खूप मोठी मागणी असून तुमच्याकडे जमीन नसेल तर तुम्ही जमीन भाड्याने घेऊन व काही वस्तू विकत घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकतात.
ग्रामीण भागामध्ये देखील हा व्यवसायाला चांगली संधी असून जवळपास जर कुठेही कार धुण्याचे सर्विस सेंटर नसेल तर तुम्ही लोकांना कार धुण्याची सेवा देऊन चांगला पैसा मिळवू शकतात. हा व्यवसाय देखील एक लाख रुपयांत सुरू करता येऊ शकतो.