लखपती, करोडपती व्हायचे असेल तर ‘या’ गोष्टी करा! जीवनातील बदल आर्थिक दृष्टिकोनातून ठरेल फायद्याचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आयुष्यामध्ये प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते व त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती पैसे कमावण्यासाठी धडपड करत असते.नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून पैसा कमावला जातो व या माध्यमातून जास्तीत जास्त गुंतवणूक करून श्रीमंत होण्याच्या दिशेने वाटचाल करण्याला प्राधान्य दिले जाते.

परंतु जर आर्थिक दृष्टिकोनातून नियोजन आणि जीवनातील शिस्तबद्धता व काही तत्वे अमलात आणली तर श्रीमंत होणे ही काही अशक्य गोष्ट नाही. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशा काही महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत ज्या तुम्हाला लखपती ते करोडपती होण्यापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला मदत करतील.

 करोडपती होण्याच्या मार्गात या गोष्टी ठरतील महत्त्वाच्या

1- बचत करा परंतु गुंतवण्यासाठी आपण पैशांची बचत करतो. परंतु केलेली पैशांची बचत ही फक्त गुंतवण्यासाठी करावी. बचत केलेले पैसे एखाद्या सुरक्षित आणि अशा ठिकाणी गुंतवावे ज्या ठिकाणाहून तुम्हाला सहजासहजी ते काढता येणे शक्य नाही. गुंतवणूक केलेले पैसे तुम्ही कधीही वापरू नये. तुम्हाला कितीही पैशाची गरज पडली तरी. या पद्धतीने गुंतवणुकीतील पैसा तुम्ही जर वापरला नाही तर तो पैसा हळूहळू वाढत जातो.

2- ज्या कर्जातून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत असे कर्ज काढू नका आपल्याकडे पैसा येईल किंवा येणारा पैसा वाढेल या कामासाठीच कर्ज काढा. ज्या  गोष्टींमुळे तुमचे उत्पन्न वाढेल अशा गोष्टींसाठी कर्ज काढा. कारण जे लोक श्रीमंत असतात ते कर्जाचा वापर गुंतवणूक आणि कॅश फ्लो वाढवण्यासाठी प्रामुख्याने करतात.

परंतु त्या तुलनेत बरेच लोक कर्जाचा वापर वस्तू विकत घेण्यासाठी करतात व अशा मुळे व्यक्ती कर्जाच्या सापळ्यात अडकतो. बँकेतून कमीत कमी व्याजदराने कर्ज घेऊन त्याचे योग्य नियोजन करून तुम्ही संपत्ती वाढवण्यासाठी त्या कर्जाचा वापर करायला शिका.

3- पैशांवर प्रेम करा आपल्याकडे भरपूर प्रमाणात पैसे असावेत अशी इच्छा प्रत्येकाची असते. त्यामुळे तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल आणि आलेली श्रीमंती टिकवायची असेल तर पैशाला प्राधान्य द्यायला शिका. तुम्ही जर पैशाचा वारेमाप वापर केला किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं तर पैसा देखील तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतो. त्यामुळे पैशांकडे दुर्लक्ष न करता त्याच्यावर प्रेम करायला शिका.

4- पैसा झोपत नाही आणि तुम्ही पैसा कमावण्यासाठी कमी झोपा असे म्हणतात की पैशाला घड्याळ कळत नाही किंवा वेळापत्रक तसेच सुट्ट्यांचा विचार देखील पैसा करत नाही. याप्रमाणे तुम्ही देखील या गोष्टींचा विचार करू नये. असे म्हटले जाते की पैसा त्या व्यक्तींवरच प्रेम करतो ज्याची मेहनत करण्याची तयारी असते. इतर लोकांपेक्षा जास्त मेहनत घ्या व ज्याप्रमाणे पैसा झोपत नाही त्याप्रमाणे तुम्ही देखील जास्त झोपू नका.

5- पैसा कसा वाढेल याबाबतीत विचार करा आजकालच्या कालावधीमध्ये पैसा खूप महत्त्वाचा असून कमावलेला पैसा साठवणे आणि तो वाढवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही जो काही पैसा कमवाल तो सातत्याने वाढत राहणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही पैशाने पैसे कसे वाढवता येतील याबाबत शिकणे  गरजेचे आहे.

6- कायम श्रीमंत माणसांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आपली स्वप्न किंवा आपले विचार हे इतर लोकांसारखे मर्यादित न ठेवता कायम श्रीमंत माणसांचा अभ्यास करण्यात किंवा ते कसे वागतात यासारखा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये एखादा अशाच आदर्श व्यक्तीची निवड करणे व त्या पद्धतीने वागणे गरजेचे आहे.

7- विचार बदला जीवन बदलेल बरेच जण कुठलाही बाबतीत विचार करत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर करोडपती व्हायचे असेल तर त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या जगामध्ये पैशांची कमतरता कधीच नाही कमतरता आहे ती मोठा विचार करणाऱ्यांचे आहे. म्हणून स्मार्ट वर्क करण्याला प्राधान्य द्या.

8- नेटवर्किंग करा आणि संबंध जोपासा सगळ्यात महत्वाचे म्हणजे श्रीमंत होण्यासाठी तुमचं नेटवर्क मोठे करणे खूप गरजेचे आहे. चांगल्या ओळखीने पुढे अनेक कामे पार पाडता येतात. त्यामुळे लोकांचा आदर करायला शिका. जीवनामध्ये कोणती व्यक्ती कधी आपल्या कामाला येईल हे कधी सांगता येत नाही. त्यामुळे माणसं जोडा. याचा देखील फायदा तुमच्या श्रीमंती होण्याच्या मार्गात खूप मोठा होतो.

9- पैशाला कामाला लावा श्रीमंत व्हायचे असेल तर गुंतवणूक ही महत्त्वाची गोष्ट आहे. मग तुम्ही जे काही नोकरी किंवा व्यवसाय करतात व त्या माध्यमातून जितका पैसा मिळवतात. त्यापेक्षा नक्कीच जास्त पैसे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून मिळायला हवेत. तुमच्याकडे जर अतिरिक्त पैसे नसतील तर तुम्ही गुंतवणूक करू शकणार नाहीत. असे इन्कम सोर्स शोधा ज्यामुळे तुम्ही काम नाही पण केले तरीदेखील तुम्हाला कायम पैसे मिळत राहतील. म्हणजेच तुम्ही पैशाने तुमच्यासाठी काम केले पाहिजे तुम्ही पैशांसाठी नव्हे असे काहीतरी करा.