सध्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. अशा योजनांच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक स्वरूपामध्ये मदत करण्यात येते. आजकालच्या महिला चूल आणि मूल या संकल्पनेपुरत्या मर्यादित राहिली नसून त्यांचे कामाचे क्षेत्र आता विस्तारत असून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने आपल्याला काम करताना दिसून येत आहेत.
बरेच महिलांनी आता कौटुंबिक जबाबदाऱ्या तसेच घराची मालकी, मुलांचे शिक्षण वगैरे इत्यादी जबाबदाऱ्या स्वतःच्या डोक्यावर घेतल्याच्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून महिलांनी मजबूत राहणे खूप गरजेचे आहे.
कारण पैसा हा प्रत्येकाला लागतोच व त्याकरिता महिलांनी देखील गुंतवणुकीला प्राधान्य देणे खूप गरजेचे आहे. या अनुषंगाने महिलांसाठी गुंतवणुकीचे सुरक्षित आणि चांगला परतावा देणारे काही पर्याय आहेत. त्यांची माहिती या लेखात आपण घेऊ.
महिला या योजनांमध्ये करू शकतात गुंतवणूक
1- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी– सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ योजना ही गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित योजना असून यामध्ये एका आर्थिक वर्षात किमान पाचशे रुपये ते कमाल दीड लाख रुपये गुंतवणूक करता येणे शक्य आहे.
या योजनेत दरवर्षी मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी संपूर्ण रक्कम ही करमुक्त असते. या योजनेचा परिपक्वता कालावधी पंधरा वर्षाचा आहे. या योजनेत जर गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर कर्ज देखील घेता येऊ शकते.
परंतु कर्जाची सुविधा ही तिसऱ्या आर्थिक वर्षानंतर उपलब्ध होते. पंधरा वर्षे या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी आहे व पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जर यामध्ये वाढ करायची असेल तर तुम्ही पाच वर्षांकरिता वाढ करू शकतात. एक फायदेशीर योजना आहे.
या योजनेमध्ये जर तुम्ही पंचवीस वर्षाच्या असाल व सेवानिवृत्ती पर्यंत सतत एक लाख 50 हजार रुपये जमा करत असाल तर निवृत्तीनंतर तुम्हाला दोन कोटी 26 लाख 97 हजार 857 रुपये मिळतील. सध्या या योजनेत 7.1% दराने व्याज मिळत आहे.
2- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना– ही एक छोटीसी बचत योजना असून गुंतवलेले पैसे सुरक्षित असण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची योजना आहे व या योजनेत व्याज देखील जास्त आहे. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केली व मुदत पूर्ण होणे आधीच जर पैसे काढले तरी कुठल्याही प्रकारचा दंड लागत नाही.
या योजनेत तुम्ही जमा केलेल्या रकमेवर 7.50% दराने चक्रवाढ व्याज उपलब्ध आहे. या योजनेचा परिपक्वता कालावधी दोन वर्षाचा आहे. म्हणजेच खाते उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी ते परिपक्व होईल. या योजनेत एक महिला कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपये जमा करू शकते.
या योजनेच्या बाबतीत लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे या योजनेचे खाते एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 दरम्यान म्हणजे दोन वर्षाच्या आत उघडावे लागेल.
3- आवर्ती ठेव खाते योजना म्हणजेच आरडी योजना– उपलब्ध असलेल्या विविध गुंतवणूक पर्यायांपैकी हा खात्रीशीर व जुना असा परतावा देणारा पर्याय आहे. तुम्हाला जर कमीत कमी पैशांमध्ये गुंतवणूक सुरू करायची असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो.
बँकेत आरडी करण्याकरिता तुम्हाला प्रत्येक महिन्याला कमीत कमी शंभर रुपये जमा करता येऊ शकतात कमाल ठेव ठेवण्यावर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.
पाच वर्षाची आरडी केली तर तुम्हाला त्यावर 6.7% व्याजदर मिळतो. यामध्ये तुम्ही ज्या रकमेने आरडी सुरू करतात तेवढीच रक्कम तुम्हाला ही योजना परिपक्व होईपर्यंत दर महिन्याला गुंतवावी लागते.