Investment plans : पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना बनवेल श्रीमंत, एफडीपेक्षा मिळत आहे जास्त व्याज…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

National Savings Certificate : पोस्ट ऑफिसची NSC लहान बचत योजना सध्या लोकप्रिय होत आहे. या योजनेमध्ये टॅक्स सेव्हिंगसोबतच तुम्हाला चांगले व्याजदर देखील मिळतात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र: पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनांमध्ये सर्वात खास आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचे पैसे येहे सुरक्षित राहतात आणि परतावाही खूप चांगला मिळतो.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सरकारद्वारे व्यवस्थापित केले जाते. यावरील व्याजदर सरकार त्रैमासिक आधारावर समायोजित करते. सध्या सरकार NSC वर 7.7 टक्के वार्षिक व्याज देते. या योजनेत गुंतवणुकीचा फायदा असा आहे की, चांगल्या परताव्याशिवाय तुम्हाला आयकर सूट देखील मिळते.

जर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात NSC मध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर त्याला आयकर कलम 80C अंतर्गत कर सूट मिळू शकते.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो. जर कोणीही खाते उघडल्यानंतर एक वर्षाच्या आत खाते बंद केल्यास, कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जात नाही. फक्त गुंतवणुकीची रक्कम दिली जाते.

सध्या एनपीएसमध्ये सरकार 7.7टक्के व्याज देत आहे. याउलट, बँकांच्या 5 वर्षांच्या कर बचत एफडीवर 7 ते 7.5 टक्के व्याजदर आहे. अशा प्रकारे पाहिल्यास, करबचत एफडीवर मिळणाऱ्या व्याजपेक्षा येथे जास्त व्याज मिळते.

तुम्ही NPS मध्ये किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकता. येथे जास्तीत जास्त गुंतवणूक रकमेवर कोणतेही बंधन नाही. NPS मध्ये गुंतवणूक ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमातून करता येते. ऑफलाइन गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल आणि तुम्ही पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन गुंतवणूक करू शकता.