Saving Scheme : ‘ही’ योजना ज्येष्ठ नागरिकांना देते आहे सर्वाधिक परतावा, बघा कोणती?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Saving Scheme : आज आपण अशा एक सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत, जी 60 वर्षांवरील लोकांना सर्वोत्तम परतावा देते. 2023 च्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) जाहीर करण्यात आली. या योजनेत आता ३० लाख रुपयांपर्यंत ठेवी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

या योजनेत खातेदाराचा मृत्यू झाल्यास, या योजनेत संयुक्त धारक किंवा नॉमिनी बनवलेले पती/पत्नी, पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेला कळवून खाते वापरणे सुरू ठेवू शकतात. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) सर्वोच्च सुरक्षा आणि कर बचत लाभ देते. आज पण या योजेनच्या पाच खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

एकरकमी गुंतवणूक

भारतात राहणारे ज्येष्ठ नागरिक वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे या योजनेत एकरकमी गुंतवणूक करू शकतात आणि कर लाभांसह नियमित उत्पन्न मिळवू शकतात.

पैसे कसे भरायचे ?

जर रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर एखादी व्यक्ती रोख स्वरूपात पैसे जमा करू शकते. जेव्हा ठेवीची रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तेव्हा व्यक्तीला चेकद्वारे पेमेंट करावे लागेल.

व्याज दर

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वर लागू असलेला सध्याचा व्याज दर वार्षिक 8.2 टक्के आहे. हा व्याजदर 1 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत लागू आहे. व्याज तिमाही आधारावर दिले जाईल

परिपक्वता कालावधी

SCSS चा परिपक्वता कालावधी 5 वर्षे आहे. या योजनेअंतर्गत, मॅच्युरिटी कालावधी आणखी 3 वर्षांसाठी वाढवता येऊ शकतो. मॅच्युरिटी कालावधी वाढवण्यासाठी चौथ्या वर्षी अर्ज द्यावा लागेल. SCSS खाते उघडताना किंवा खाते उघडल्यानंतर व्यक्ती नामनिर्देशित व्यक्तीची नियुक्ती करू शकतात.

खाते कुठे उघडू शकता?

ही पोस्ट ऑफिस योजना आहे. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडू शकतात.